शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा परिषद निवडणूक : जागा टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:41 IST

महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असल्याने काँग्रेस, राकाँ व शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गतवेळच्या १७ जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील अस्तित्वासाठी अधिकाधिक जागा निवडून आणण्याची कसरत भाजपाला करावी लागणार आहे.येत्या ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येत असलेल्या सहा पंचायत समित्यांची निवडणूक होत आहे. ५२ जिल्हा परिषद गटासाठी ५३२ तर १०४ पंचायत समिती गणासाठी ८०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत अजूनही महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असल्याने काँग्रेस, राकाँ व शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. गतवेळी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविलेल्या काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या. वाशिम जिल्हा स्थापनेपासून ते २०१९ पर्यंत काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या अनंतराव देशमुख यांना पक्षाने निष्काषित केल्यानंतर, रिसोड व मालेगाव तालुक्यात देशमुख समर्थकांनीदेखील काँग्रेसशी फारकत घेतल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माजी खासदार देशमुख यांनी वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या नावाखाली रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात स्वतंत्र उमेदवार उभे करून प्रमुख राजकीय पक्षांपुढे आव्हान निर्माण केले. याचा फटका काँग्रेसच्या काही उमेदवारांना बसण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. गतवेळच्या जागा टिकवून ठेवण्याबरोबरच अजून काही जागा निवडून आणता येतील का या दृष्टिकोनातूनही काँग्रेसतर्फे चाचपणी केली जात आहे. गतवेळच्या जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेसच्यावतीने कसे पेलते जाते? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. कारंजा व मानोरा तालुक्यात शिवसेना, राकाँ एकत्र येत असल्याने येथे काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भारिप-बमसंचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी हे काँग्रेसवासी झाल्याने या दोन तालुक्यात ते काँग्रेसला कसे तारणार, यावर त्यांचे संभाव्य राजकीय वजन अवलंबून राहणार असल्याचेही बोलले जात आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुक ही भारतीय जनता पार्टीच्यादृष्टीने महत्वपूर्ण मानली जात आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात भाजपाची मजबूत पकड नसते, असे एकंदरीत बोलले जाते. हा समज चुकीचा ठरविण्याची संधी भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीमुळे चालून आली आहे. गतवेळी भाजपाला केवळ सहा जागेवर विजय मिळविता आला होता. १९९८ पासून ते आतापर्यंत एकदाही भाजपाला सत्तेला गवसणी घालता आली नाही. जिल्ह्यात तीन पैकी दोन आमदार हे भाजपाचे असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्य संख्या वाढविण्याची कसरत भाजपाला करावी लागणार आहे.ग्रामीण भागातील अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. राजूरा जि.प. गटात दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या एबी फॉर्मवरून अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आल्याने जिल्हा परिषदेची निवडणुक भाजपासाठी अवघड मानली जात आहे.राकाँ जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाची कसोटीजिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रतिष्ठेची ठरत आहे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्ष पद आल्यानंतर चंद्रकांत ठाकरे हे पहिल्यांदा जिल्हाध्यक्ष म्हणून जि.प. निवडणुकीला सामोेरे जात आहेत. तत्कालिन जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी राकाँला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीची वाट धरली आहे. जाधव यांचे मालेगाव तालुक्यात राजकीय प्रस्थ असल्याने ती उणीव भरून काढण्याचे आव्हान राकाँसमोर उभे ठाकले आहे. जिल्हा परिषद निवडणुक ही चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लावणारी ठरणार असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. गतवेळी राकाँच्या आठ जागा होत्या. यावेळी जागा वाढविण्याचे आव्हानही राकाँला पेलावे लागत आहे.शिवसेनेच्या राजकीय डावपेचाकडे लक्षनेहमी धक्कातंत्राचा वापर करणाºया शिवसेनेचे राजकीय डावपेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नेमके काय राहतील, याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. गतवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून डॉ. सुधीर कव्हर होते. यावेळी जिल्हा प्रमुखाची धुरा सुरेश मापारी यांच्याकडे आली आहे. गतवेळी शिवसेनेचे आठ जिल्हा परिषद सदस्य होते. यावेळी अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याची कसरत शिवसेनेला करावी लागणार आहे. गतवेळी भाजपा व शिवसेनेची युती होती. यावेळी भाजपा सोबत नसल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी शिवसेनेला नव्याने मांडणी करावी लागणार आहे. यामध्ये जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या धक्कातंत्राकडे लक्षवंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत रिसोड व वाशिम विधानसभा मतदारसंघात बºयापैकी मते घेतली होती. गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत तीन सदस्य निवडून आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली जिल्हा परिषद निवडणूक लढविली जात असून, अन्य पक्षातील माजी पदाधिकाऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरवून निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या प्रयत्नाला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदElectionनिवडणूक