शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झोलेबाबा संस्थानचा ५०० झाडे लावण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 14:10 IST

शेलुबाजार :  वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे ब्रिद जपत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजिक चिखली येथील प्रसिध्द झोलेबाबा संस्थानच्यावतिने ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

- साहेबराव राठोड  शेलुबाजार :  वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे ब्रिद जपत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजिक चिखली येथील प्रसिध्द झोलेबाबा संस्थानच्यावतिने ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक ती तयारीही पूर्ण करण्यात आली आहे.जिल्हयातील प्रसिध्द देवस्थानामध्ये चिखली झोलेबाबा संस्थान गणल्या जाते. येथे दरवर्षी मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन होत असून लाखो भाविकांची येथे गर्दी असते. यात्रेनिमित्त मंदिर परिसरातील मैदानावर आयोजित महाप्रसाद घेतांना भाविकांना उन्हात बसावे लागते. हिच बाब हेरुन संस्थानच्यावतिने या भागात वृक्षारोपण केल्यास सोयीचे होईल तसेच दिवसेंदिवस घ्ज्ञटन चाललेल्या वसुंधरेला वाढविण्यात येईल. या दृष्टीकोनातून दोन वर्षात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. पहिले वर्ष २०१९ मध्ये ५०० झाडांचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यंदा वाशिम जिल्ह्यात ४३ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाने रोपांची उपलब्धता केली असून, जिल्हा प्रशासनाने या वृक्षलागवड योजनेच्या आढावा सभेत विभागनिहाय उद्दिष्ट निश्चित केले आहे. शासनाच्या या उपक्रमाला हातभार लावून पर्यावरण संवर्धनासाठी चिखली येथील झोलेबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. सदर वृक्षारोपण पुर्वी झाडाचे संगोपन व्हावे यासाठी त्या परिसरात तारकुंपण करण्यात आले आहे त्याच बरोबर पाचशेच्या जवळपास खड्डे तयार करण्यात आले आहे. ड्रिपव्दारे झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वृक्षरोपणाासाठी झोलेबाबा संस्थाननी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

ड्रिपव्दारे झाडांना पाणीमंगरुळपीर तालुक्यातील झोलेबाबा संस्थान चिखली येथे करण्यात आलेल्या संकल्पानानुसार पूर्ण तयारी करण्यात आली असून. वृक्ष संगोपनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. वृक्षांना पाणी कमी पडू नये याकरिता संस्थानच्यावतिने ड्रिपव्दारे वृक्षांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारे साहित्यही आणण्यात आले आहे. लवकरच या कार्यास प्रारंभ होणार असल्याचे नारायण सुर्वे यांनी सांगितले.दोन वर्षात लागणार एक हजार झाडेझोलेबाबा संस्थान चिखलीच्यावतिने यावर्षात ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच पुढच्या वर्षी ५०० झाडे असे एकूण १००० झाडे दोन वर्षात लावण्यात येणार आहे. यावर्षीची तयारी करण्यात आली असून खड्डे खोदून ठेवण्यात आले तसेच झाडे लावण्यात येणाºया परिसराला तार कंपाउड करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर