शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मन, बुद्धीला न पटणाऱ्या बाबींबद्दल युवकांनी ठोस भूमिका घ्यावी! - विठ्ठल वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:20 IST

युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आपल्या सभोवताल जे घडते, ते मनाला व बुद्धीलाही पटत नाही. असे असताना आपण त्याच्याबद्दल कुठलीही ठोस भूमिका घेत नाही, प्रतिक्रिया नोंदवत नाही, अशी सद्याची परिस्थिती आहे; मात्र असे व्हायला नको. युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय व सृष्टी बहुद्देशीय संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ फेब्रूवारीला चौथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. डॉ. योगीनी सातारकर-पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या युवा मराठी साहित्य संमेलनास प्रा. डॉ. संतोष हुशे, नाट्यकर्मी सुरेश नागले, ज्येष्ठ लेखक नामदेव कांबळे, तेजेंद्रसिंह चौहान, प्राचार्य संजय चौधरी, डॉ. विजय काळे, तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक मनजितसिंह शिख, काव्याग्रहचे विष्णू जोशी, पूर्व संमेलनाध्यक्ष नवनाथ गोरे, नाशिकचे किरण सोनार, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. पप्पू मोरवाल, वºहाडी साहित्यिक अरविंद शिंगाडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.लोक कवी विठ्ठल वाघ म्हणाले, गरिबी आहे, दारिद्रय आहे, मी खेड्यातून आलो आहे, असे वारंवार म्हणून रडत बसायचे नाही. कितीही मोठा पहाड चढणे कठीण असते म्हणून हार मानू नका; तर सतत जिंकण्यासाठी संघर्ष करा, असा सल्ला यावेळी विठ्ठल वाघ यांनी उपस्थित युवा साहित्यीकांना दिला. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सृष्टी’चे अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले. विशालराजे बोरे, प्रा. गजानन वाघ यांनी सूत्रसंचालन केले.दुसºया सत्रात ‘कायद्याची सक्ती महिलांवरील अत्याचार थांबवू शकते का?’ या विषयावर परिसंवाद झाला. तिसºया सत्रात नितीन वरणकार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. गोपाल खाडे, वैभव भिवरकर, अ‍ॅड. विशाखा बोरकर, अनिकेत देशमुख, ग. ना. कांबळे, गजानन फुसे, प्रा. सुनिता अवचार, स्वप्नील कोकाटे, गणेश बोंडे, रामदास देशमुख आदिंनी रंगारंग कविता सादर करून संमेलनात रंगत आणली. सूत्रसंचालन चाफेश्वर गांगवे, डॉ. विजय काळे यांनी केले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. योगिनी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, कथाकार सुरेश पाचकवडे, अ‍ॅड. अनंत खेळकर, नरेंद्र लांजेवार, किशोर बळी, प्रा. डॉ. मोहन खडसे, माणिक शेळके, डॉ. नितेश खोंडे, डॉ. हरीश बाहेती, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्कार, युथ आयकॉन पुरस्कारांचे वितरणही संमेलनात करण्यात आले.

 

टॅग्स :washimवाशिमliteratureसाहित्य