कारंजा लाड (वाशिम) : औरंगाबाद - नागपूर द्रूतगतीमार्गावरील दोनद ते यावर्डी शेतशिवारातील शंकर भांगे यांच्या शेताजवळील खड्डय़ात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मुतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनधारकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मारोजी ढवकर (२८ ) असे मृतकाचे नाव आहे. ते येवता येथील रहिवासी असून, व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर होते. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान ढवकर घरून निघून गेले होते. त्यांचा अज्ञात ट्रकच्या धडकेने मुत्यृ झाला असल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्यावरुन कारंजा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम ३0४ अ नुसार गुन्.हा दाखल केला आहे.
वाहनाच्या धडकेत युवक ठार
By admin | Updated: November 16, 2014 01:32 IST