शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

‘युवा माहिती दूत’ : शाळा, महाविद्यालयांत जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:18 IST

वाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयस्तरांवर जनजागृती केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयस्तरांवर जनजागृती केली जात आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घेतले जाणार असून, प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचाºयांपैकी एका  जणांची ‘मार्गदर्शक’ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.‘युवा माहिती दूत’ या उपक्रमामुळे महाविद्यालयीन युवकांना शासकीय योजनांची माहिती होतकरू, पात्र लाभार्थींपर्यंत पोहचवावी लागणार आहे. या उपक्रमामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांला शासनाच्या कल्याणकारी योजनांची अचूक माहिती तसेच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.दारिद्र्यरेषेखालील, ग्रामीण तसेच दुर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित  लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्यासाठी  असलेल्या  विविध योजनांची  माहिती  पोहचविण्याचे काम युवा माहिती दुतांना करावे लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी त्या महाविद्यालयातील प्राध्यापक वा शिक्षकेतर कर्मचारी यापैकी एक ‘मार्गदर्शक’ म्हणून नेमण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी  विशेष मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून  या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनमध्ये  प्रत्येक  महाविद्यालयातील  मार्गदर्शक, समन्वयक आणि सहभागी युवक यांचे अकाऊंट राहणार आहे.  महाविद्यालयातील  विद्यार्थी ‘माहितीदूत’ होण्यासाठी   स्वत:हून  या  अ‍ॅप्लिकेशनवर  स्वत:च्या  नावाची  नोंदणी करतील. मार्गदर्शक, समन्वयक, माहिती दूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत राहणार आहे. या उपक्रमाची जनजागृती शाळा, महाविद्यालया स्तरावर केली जात आहे.  जिल्हास्तरावर जिल्हा माहिती अधिकारी हे नोडल अधिकारी असून, प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून हे मार्गदर्शक महाविद्यालयाची नोंदणी करणार आहेत. संबंधित अ‍ॅपवर ‘माहिती दूत’ होण्याची इच्छा व्यक्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाला संबंधित महाविद्यालयातील ‘मार्गदर्शक’ मंजूरी देतील किंवा नामंजूर करू शकतील.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाcollegeमहाविद्यालय