शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूतीसाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:33 IST

वाशिम : आजच्या धकाधकीच्या तथा व्यस्त जीवनात शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूत राहायचे असेल तर नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी येथे २१ जून रोजी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आजच्या धकाधकीच्या तथा व्यस्त जीवनात शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूत राहायचे असेल तर नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी येथे २१ जून रोजी केले. स्थानिक वाटाणे लॉन्समध्ये झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त वतीने आयोजित योगदिनाच्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, पतंजलीचे डॉ. भगवंतराव वानखेडे, आर्ट आॅफ लिव्हींगचे डॉ. हरीष बाहेती, विद्याभारतीचे दिलीप जोशी, स्वामी सत्यानंद योग केंद्राचे राम छापरवाल, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी म्हणाले, भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकाने सुखी, संपन्न तथा निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासनांचा नियमित सराव करायलाच हवा, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. वानखेडे, विजय चव्हाण, दीपा वानखेडे यांनी उपस्थितांना योगमुद्रा, ध्यानमुद्रा, वक्रासन, वज्रासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, कपालभाती, प्राणायाम, भद्रासन यासह विविध योग शिकविले. पतंजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंग, विद्याभारती, स्वामी सत्यानंद योग केद्र, भारत स्वाभिमान, भारत स्काऊट आणि गाईड, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, लॉयन्स क्लब, नेहरु युवा केंद्रा, व्यंकटेश योग अभ्यास मंडळाच्या पदाधिकाºयांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी प्रास्ताविक केले. संचालन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी उप्पलवार यांनी मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :washimवाशिमInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन