रिसोड (वाशिम) : गतवर्षी अतवृष्टीमुळे हातातोंडाचा घास हिरावला गेला. यंदा विपरीत हवामानामुळे पावसाअभावी सलग दुसर्यांदा खरीप हंगाम हातचा निघून गेला. प्रामुख्याने ७0 टक्के क्षेत्रावरील सोयाबीन वाया गेल्याने दिवाळीचा बाजार कसा करावा, असा प्रश्न रिसोड तालु क्यातील शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. एका एकरातील सोयाबीन जरी विकले तरी उत् पादन खर्चही निघण्याची शक्यता कमी असल्याने बळीराजाची दिवाळी कडू जाण्याची श क्यता बळावली आहे. तालुक्यात ७0 टक्के हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. यंदाही इतर पिकांऐवजी शे तकर्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनला पसंती दिली. महिन्याच्या उशिराने पेरणी झाल्याने उत्पादनात घट होणारच होती. अधिक उत्पादनासाठी शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात खर्चही केला. एका एकरासाठी २७00 रूपयांची बॅग, ९00 ते ११00 रूपयांची खताची पिशवी मिळून ४000 रुपये लागवड खर्च लागला. दरम्यान, दोनदा खत आणि फवारणी मिळून किमान ३000 हजारांचा खर्च लागला. शेंगा धरण्याच्या मोसमात पाऊस गायब झाला. मागील एका महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. दरम्यान, सोयाबीन जाग्यावर करपले. ते शेताबाहेर काढणेही अवघड झाले. एका बॅगसाठी २000 रूपयांची मजुरी लागत आहे. मजुरी निघेल एवढेही उत्पादन होत नाही. एका बॅगला सर्रास १ किंवा २ क्विंटलाचा उतारा येत आहे. एका बॅगला १0 हजारांचा खर्च करून दोन क्विंटलही सोयाबीन होत नाही. आधीच सावकाराच्या पैशांवर कशीबशी पेरणी केली होती. त्याची परतफेड करणेही शक्य नाही. या स्थितीत दिवाळीच्या बाजारासाठी पैसा कोठून आणणार, हा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.
यंदा बळीराजाची दिवाळी कडू
By admin | Updated: October 19, 2014 00:29 IST