शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातील कामाची फलश्रृती : पोहा येथील  उमा, केदार नद्यांचे जलपुजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:28 IST

पोहाचे सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी तथा जि.प. सदस्य मंदा शरद दहातोंडे यांनी दोन्ही नद्यांच्या पात्रात सोमवारी विधिवत जलपुजन केले.

ठळक मुद्देसरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांनी नद्यांच्या जलपुजनाचा कार्यक्रम घेतला. वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणाऱ्यांचा गावकऱ्यांकडून सत्कारही करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपोहा: वॉटर कप स्पर्धेत पोहा येथील गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे. या गावातील सदानकदा कोरड्या राहणाऱ्या उमा, केदार नद्यांचे पात्र आता पाण्याने भरले आहे. याचा उत्सव साजरा करण्यासाठी पोहाचे सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी तथा जि.प. सदस्य मंदा शरद दहातोंडे यांनी दोन्ही नद्यांच्या पात्रात सोमवारी विधिवत जलपुजन केले. हभप विलास महाराज यांनी जलपुजन विधीचा कार्यक्रम सांभाळला.गेल्या काही वर्षांतील अवर्षण, तसेच कचऱ्यामुळे पोहा येथील उमा आणि केदार या दोन्ही नद्यांचे पात्र बुजत चालले होेते. परिणामी पावसाळ्यांतही या पात्रात पाणी थांबेनासे झाले होते. त्यामुळेच गावातील जलपातळीत चिंताजनक घट होऊन गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या लक्षात घेत सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांनी वॉटर कप २०१८ च्या स्पर्धेत गावाची नोंदणी केली आणि गावातील वॉटर हिरोंना प्रशिक्षणासाठी पाठविले. ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावांत श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली. यात उमा आणि केदार नदीच्या पात्राचेही खोलीकरण करण्यात आले. या कामांची चांगलीच फलश्रृती झाली असून, गावातील विहिरी, कूपननलिकांची पातळी कमालीची वाढलीच शिवाय उमा आणि के दार नद्यांचे पात्रही दुथडी भरून वाहण्यास सुरुवात झाली. या जलक्रांतीचा उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांनी नद्यांच्या जलपुजनाचा कार्यक्रम घेतला. डॉ. विनोद चव्हाण, राजू आसरकर, अनिस बागवान यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून सरपंच व जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांच्या हस्ते नद्यांचे जलपुजन करून घेतले. यानंतर सरपंच व जि. प. सदस्यांसह वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणाऱ्यांचा गावकऱ्यांकडून सत्कारही करण्यात आला. यावेळी उपसरपंच ललिता तायडे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर दहातोंडे, महेंद्रा होले, चंद्रकांत राठोड, कुलदीप अवताडे, वंदना खुरसडे, वर्षाताई पवार, द्वारकाबाई वडते, बाळासाहेब दहातोंडे, लक्ष्मण ढोकणे, मधुकर ढवळे, अशोक जोगदंड, ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे, माजी सरपंच अशोक अरक, मोतीराम तोरकडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन ढोकणे, अंबादास अळसपुरे यांच्या महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा