शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात ३५ गावच्या सरपंचांनी सांभाळली श्रमदानाची धुरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:22 IST

वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात जणू श्रमदानाचे तुफानच आले आहे. या दोन तालुक्यातील ११५ गावांपैकी ६२ गावे स्पर्धेत जोमाने श्रमदान करीत असून, यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे.

ठळक मुद्दे११५ गावांनी अर्ज केले असले तरी, प्रत्यक्षात ६२ गावे या स्पर्धेत सक्रियतेने श्रमदान करीत आहेत.यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतानाच ही सरपंच मंडळी जलसंधारणाची कामे करीत आहेत.

वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात जणू श्रमदानाचे तुफानच आले आहे. या दोन तालुक्यातील ११५ गावांपैकी ६२ गावे स्पर्धेत जोमाने श्रमदान करीत असून, यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे. श्रमदान करणाºया ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतानाच ही सरपंच मंडळी रक्ताचे पाणी करून गावात जलसंधारणाची कामे करीत आहेत.   राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेंत गतवर्षी कारंजा तालुक्याची निवड झाली होती. आता यंदा या स्पर्धेत कारंजासह मंगरुळपीर तालुक्याचीही निवड झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील मिळून ११५ गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले असले तरी, प्रत्यक्षात ६२ गावे या स्पर्धेत सक्रियतेने श्रमदान करीत आहेत. यापैकी ३५ गावांचे सरपंच स्वत: श्रमदान करून गावकºयांसमोर आदर्श ठेवत आहेत. गाव दुष्काळमूक्त व्हावे म्हणून जलसंधारणाची कामे करण्यासाठी हे सरपंच प्रेरित झाले आहेत. विशेष म्हणजे उन्हात काम करताना ग्रामस्थांना थकवा येऊ नये म्हणून पाण्याची निवाºयाची सोय त्यांनी केली आहे. वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणाºया सरपंचांमध्ये  मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा, गणेशपूर येथे राजेंद्र राऊत, तपोवन येथे सुनिल येवले, पिंपळखुटा येथे चंदा सुदर्शन धोटे, वनोजा येथे दिलिप राऊत, पारवा, बोरव्हा बु. आणि लखमापूर येथे गोपाल लुंगे, मोहरी येथे संजय गावंडे, पोटी येथे प्रकाश गावंडे, पोघात, घोटा येथे नंदू गावंडे, कोठारी येथे भाऊ पवार, नागी येथे सतिष राऊत, लाठी येथे गणेश सुर्वे, शेंदुरजना मोरे येथे अशोक धामंदे, सायखेडा येथे विद्या देवमन गहुले, कोळंबी येथे फिरोज मोहनावाले, जांब येथे साहेबराव भगत, शेलगाव येथे किशोर भोयर, पिंपळगाव येथे विष्णू चव्हाण, जोगलदरी येथे शेषराव पवार, नांदगाव बंडू पवार, यांच्यासह आणखी चार गावांत सरपंच श्रमदानात सक्रीय सहभागी आहेत. कारंजा तालुक्यात सरहदपुर येथे संगिता चौकट, पिपळगाव बु येथे दादाराव बहुटे, प्रिपी मोडक येथे ललिता थोंटागे, बेलमंडळ येथे सचिन एकनार, झोडगा येथे सुवर्ण पवार, काकड शिवणी येथे संगिता चक्रनारायण, दोनद बु येथे निरंजन करडे आणि भुलोडा येथे मंदा ढोणे यांच्यासह आणखी दोन गावांत सरपंच श्रमदानात सक्रीय सहभागी झाले आहेत.  ग्रामस्थांची फराळ, पाण्याची सोयगावातून दुष्काळ हद्दपार करण्यासाठी सरंपच स्वत: श्रमदानच करीत नाहीत, तर कामे झाली पाहिजेत आणि ग्रामस्थही थकू न त्यांचा धीर खचू नये म्हणून विशेष काळजी सरपंचाकडून घेतली जात आहे. पारवा गटग्रामपंचायतचे सरपंच गोपाल लुंगे, जांबचे सरपंच साहेबराव भगत, नागीचे सरपंच सतिष राऊत हे श्रमदान करणाºया ग्रामस्थांसाठी चहापानाची व्यवस्था करीत आहेत. पिंपळखुटा येथील सरपंच चंदा सुदर्शन धोटे या, तर स्वत: घरूनच श्रमदान करणाºया ग्रामस्थांसाठी फराळाचे, नाश्त्याचे पदार्थ आणि चहा घेऊन सकाळीच दाखल होतात. ग्रामस्थांसोबतच चहापाणी घेऊन स्वत: श्रमदानाला सुरुवात करतात.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwashimवाशिमKaranjaकारंजाMangrulpirमंगरूळपीर