शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

टँकरग्रस्त गावात लोकसहभागातून झाली जलसंधारणाची कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:23 IST

वाशिम : २०११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणाºया वाळकी-दोडकी या गावात २०१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २०१२ ते २०१६ या चार वर्षात लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यावर्षी पावसात सातत्य नसतानाही, दोडकी परिसरातील तलाव, नाले, विहिरींना बºयापैकी पाणी असल्याने शेतकºयांना खरिपाची पिके चांगल्या पद्धतीने जगविता आली.

ठळक मुद्देशेती सिंचन शक्य भूगर्भातील जलपातळीत वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २०११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणाºया वाळकी-दोडकी या गावात २०१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २०१२ ते २०१६ या चार वर्षात लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यावर्षी पावसात सातत्य नसतानाही, दोडकी परिसरातील तलाव, नाले, विहिरींना बºयापैकी पाणी असल्याने शेतकºयांना खरिपाची पिके चांगल्या पद्धतीने जगविता आली.एरव्ही हिवाळ्याला सुरूवात होत नाही; तोच दोडकी येथे दरवर्षी पाणीटंचाई जाणवत होती. पाणीटंचाईच्या दाहकतेतून गावाला बाहेर काढण्यासाठी गावकºयांनी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांची मुहूर्तमेढ रोवली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष नानवटे यांनी पुढाकार घेतला. सलग चार ते पाच वर्षे जल चळवळ राबविली. जलयुक्त शिवार अभियानातही गावाचा समावेश झाला. लोकसहभाग आणि विविध स्वयंसेवी, दानशूरांच्या मदतीतून माती बंधारे, दगडी बांध, शेततळी, नाविन्यपूर्ण रिचार्ज पिट, नाला खोलीकरण, सिमेंट, गॅबियन, भूमिगत व वनराई बंधारे, फायबर सीट बंधारे आदी जलसंधारणाची कामे झाली. परिणामी शिवारात पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला व भूगर्र्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. यामुळे गावकºयांमध्ये जलसाक्षरता वाढली. शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुषार सिंचनाचा वापर करू लागले. कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन होत आहे. यावर्षी पावसात सातत्य नसतानादेखील दोडकी परिसरातील शेतकºयांनी विविध जलस्त्रोतांच्या आधारे सोयाबीन व अन्य पिके फुलविली असल्याचे दिसून येते. गत दोन वर्षांपासून गाव टँकरमुक्त झालेले आहे. लोकसहभागातून गावकºयांनी साधलेली जलसमृद्धीची ही किमया इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

कधीकाळी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. लोकसहभागातून व संपूर्ण गावकºयांच्या एकजुटीतून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात आली. परिणामी आता गाव टँकरमुक्त तर झाले आहेच; शिवाय पावसाने दडी दिलेली असतानाही विविध प्रकारच्या जलस्त्रोतांच्या माध्यमातून पिकांना सिंचन करणे शक्य झाले. जलपातळीत वाढ झाल्याने अन्य गावांच्या तुलनेत दोडकीतील पीक परिस्थिती बºयापैकी असल्याचे थोडेफार समाधान आहे.- सुभाष नानवटे, ग्रामस्थ, दोडकी.