शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वनवृत्तात होणार जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 15:48 IST

वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे. यासाठी ३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी ३१ जानेवारीच्या निर्णयाव्दारे मंजूर केला असून, यात यवतमाळ वनवृत्तात येणाºया भागांसाठी १ कोटी १ लाख रुपयांची तरतूद आहे.राज्यातील गडचिरोली, यवतमाळ, औरंगाबाद व अमरावती या वनवृत्तात साठवण तलाव, खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची प्रस्तावित कामे करण्याबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी शासनाकडे पत्र पाठविले होते. आता २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात वनतळे, सिमेंट बंधाºयाचे बांधकाम करण्याच्या योजनेसाठी ११ कोटींचा निधी मंजूर आणि अर्थ संकल्पित असून, या निधीपैकी ३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी वनतळे, सिमेंट बंधाºयांची कामे करण्यासाठी वितरित करण्यात आला असून, अपर प्रधान मुख्य नवसंरक्षकांच्या मागणीनुसार उपरोक्त चार वनवृत्तात ३७९.२६ लाख रुपयांचा वितरित व खर्च करण्यास शासनाने ३१ जानेवारीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. या निधीतून मंजूर असलेली जलसंधारणाची कामेच करण्यात येणार असून, त्यात यवतमाळ वनवृत्तात वनतळे, खोदतळे, सिमेंट बंधाºयांच्या कामांसाठी १ कोटी १ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे यवतमाळ वनवृत्तातंर्गत येणाºया यवतमाळ प्रादेशिक वन परिक्षेत्रासह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील प्रादेशिक वनक्षेत्रातही वनतळे, सिमेंट बंधाºयांची कामे होऊन वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय होईल आणि पाण्यासाठी भटकणाºया वन्यप्राण्यांचा जीवही वाचू शकणार आहे.  वाशिम जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात साठवण तळे व जलसंधारणाची कामे गतवर्षी प्रस्तावित करण्यात आली होती. आता शासनाने निधी मंजूर केल्यानंतर ही कामे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- अशोक वायाळ, सहाय्यक वनसंरक्षक, प्रादेशिक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमforestजंगलforest departmentवनविभाग