शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मानोली येथील मडाण नदीच्या उपनाल्याचे काम युद्ध पातळीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:18 IST

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मडाण नदीच्या विस्तारासाठी सुरू असलेल्या उपनाल्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मंगरुळपीर तालुक्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मडाण नदीच्या विस्तारासाठी सुरू असलेल्या उपनाल्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पूर्वी बुजलेला हा नाला खोदल्याने गावात पाणी शिरण्याची समस्या मिटणार असून, परिसरातील १२ गावच्या ग्रामस्थांत या कामामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा ते पिंपळखुटा अशी १२६०० मीटर अंतराच्या मडाण नदीचे पात्र गाळ साचून, झुडपे वाढल्याने बुजत चालले आहे. त्यातच या नदीला जोडणारे १३ उपनालेही बुजले होते. त्यामुळे पूर्वी सिंचनाखाली असलेल्या भागातील शेतकरी केवळ पावसावर विसंबला होता. मानवच नव्हे तर पशु-पक्षी, प्राण्यांवरही परिणाम होताना दिसत होते. विशेष म्हणजे मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस मडाण नदी खोºयात पडतो. पण नदी बुजल्याने पाणी थांबत नव्हते आणि उन्हाळ्यात या परिसरातील गावात पिण्याच्या पाण्यासाठी मारामार सुरू झाली होती. या नदीच्या भरवशावरच कधी काळी तालुक्यात सर्वाधिक दूग्ध उत्पादनासह मत्स्य व्यवसायही होत असे; परंतु  केवळ नदी अरूंद व उथळ झाल्याने शेतकरी, शेतमजुरांचा जोडधंदा हिरावल्या गेला. त्यामुळे तालुक्यातील १३ गावांसाठी उपयुक्त ठरू शकणाºया या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती.  जलचळवळीचे कार्यकर्ते सचिन कुळकर्णीही यांनी पुढाकार घेतला. त्यावर डिसेंबर २०१८ मध्ये लोकनेते लक्ष्मीकांत महाकाळ यांनी येथे जलतज्ज्ञांना आमंत्रित करून मडाण परिषद घेतली. नागपूर येथील एका नामांकित जलसिंचन संस्थेने या नदीच्या खोलीकरण, विस्तारीकरणाचा आराखडाही तयार केला आणि तो आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. केंद्रीय जलसंधारण मंत्री नितिन गडकरी यांनीही याबाबत शासनाकडे शिफारस केली होती. आता बीजेएसच्या पुढाकाराने हे काम सुरु झाल्याने १२ गावांतील ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी