शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘मी वाशिमकर’ ग्रुपच्या कार्याचे आढावा बैठकीत कौतूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:16 IST

गृपच्या कार्याची  दखल घेत या ग्रुपला  २९ मे रोजी अमरावती येथे आयोजीत विभागीय वृक्ष लागवड आढावा बैठकीचे निमंत्रण पाठवून बोलावून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  विविध सामाजिक उपक्रमात अग्रस्थानी असलेल्या ‘मी वाशिमकर ग्रुप'ने वाशिम शहर ग्रीन सिटी करण्यासाठी वृक्ष लावून जगविण्याचा संकल्प केला. या उपक्रमाच्या शिस्तबध्द नियोजनामुळे वाढता लोकसहभाग पाहता  या विधायक कामाची माहिती राज्याचे वनमंत्र्यांपर्यंत पोहचली. राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या गृपच्या कार्याची  दखल घेत या ग्रुपला  २९ मे रोजी अमरावती येथे आयोजीत विभागीय वृक्ष लागवड आढावा बैठकीचे निमंत्रण पाठवून बोलावून घेतले. या गृपच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतूक करीत असे कार्याची आज गरजच असल्याचे सांगितले. शहरातील उत्साही युवकांनी तयार केलेल्या ‘मी वाशिमकर ग्रुप' माध्यमातून विविध समाजपयोगी कामांचा विडा उचलला. शहरातील तलावांची स्वच्छता, स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन, यासारख्या विविध समाजपयोगी उपक्रम राबविल्यानंतर शहर हिरवेगार करण्यासाठी हा गृप सरसावला. त्या दिशेने कार्यास प्रारंभ केला, पाहता पाहला लोक जुळत गेली व ही एक चळवळ झाली. या चळवळीची माहिती दूरपर्यंत पोहचली. वनमंत्र्यांना याची माहिती झाल्याबरोबर त्यांनी विभागीय आढावा बैठकीस येण्याचे आमंत्रण दिले. या बैठकीस सर्वांना जाणे शक्य नसल्याने प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. टेकाडे, मनिष मंत्री व खंडाळकर यांनी उपस्थिती दर्शविली. तेथे या गृपच्या कार्याचे कौतूक होवून यांनी सुरु केलेले कार्याची माहिती घेवून तश्याप्रकारे नागरिक कसे जुळतील याकडे लक्ष देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.  वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणात वाशिमकर गृृप राबवित असलेल्या कार्याची माहिती देवून त्यांचे कौतूक केले.मी वाशिमकर गृपने घेतलेले कार्य यशस्वीतेसाठी संपूर्ण शहरवासीयांचे योगदान लाभत आहे. यामुळे या गृपचे मनोबल वाढत असल्याचे सदस्यांमध्ये बोलल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक