शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दलित वस्तीची कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:29 IST

वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत संबंधित कंत्राटदारांना करावी लागणार आहे.

ठळक मुद्दे सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत कंत्राटदारांना करावी लागणार आहे.विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास देयक अदा केले जाणार नाही, अशा सूचना समाजकल्याण विभागाने दिल्या आहेत.

वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत संबंधित कंत्राटदारांना करावी लागणार आहे.

दलित वस्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे विविध कामे प्रस्तावित केली जातात. अनेक दलित वस्तींमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही तर काही दलित वस्तींमध्ये ये-जा करण्यासाठी सिमेंट रस्ता नाही तसेच पथदिवे, सभागृह आदी सुविधा नसल्याने दलित वस्त्या विकासापासून कोसो दूर आहेत. दलित वस्तींचा विकास साधण्यासाठी तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकूण २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. सर्वाधिक कामे मालेगाव तालुक्यात ५२ आहेत. या कामांसाठी १ कोटी ९४ लाख २५ हजार रुपये निधी,  वाशिम तालुक्यात एकूण ४० कामे असून एक कोटी ६७ लाख ६० हजार रुपये, रिसोड तालु्क्यात ४९ कामे असून दोन कोटी सहा लाख २० हजार रुपये, मंगरूळपीर तालुक्यात ४२ कामे असून एक कोटी ४२ लाख २० हजार रुपये, कारंजा तालुक्यात ३८ कामे असून एक कोटी ३९ लाख ५ हजार तर सर्वात मानोरा तालुक्यात २८ असून एक कोटी ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. आतापर्यंत केवळ ५० कामे पूर्ण झाल्याने उर्वरीत कामे २५ दिवसात पूर्ण करण्याची कसरत संबंधित कंत्राटदारांना पूर्ण करावी लागणार आहे. विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास देयक अदा केले जाणार नाही, अशा सूचना समाजकल्याण विभागाने दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना