शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला, मुलींनी मानसिक कणखर व्हावे - निलोफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:38 IST

आत्मविश्वासाच्या बळावर वाशिम पोलिस दलातील निलोफर बी. शेख नशीर यांनी अमरावती परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धेतील विविध प्रकारात पाच सुवर्ण पदक मिळविले.

- सुनील काकडे वाशिम : आई-वडिलांकडून सदोदित मिळालेली प्रेरणा, स्वत:ला समाजासमोर सिद्ध करण्याची जीद्द आणि उत्तूंग आत्मविश्वासाच्या बळावर वाशिम पोलिस दलातील निलोफर बी. शेख नशीर यांनी अमरावती परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धेतील विविध प्रकारात पाच सुवर्ण पदक मिळविले. या यशामागील रहस्य, निर्भेळ यशासाठी नवोदित खेळाडूंनी नेमके काय करायला हवे, समाजातील मुली व महिलांना कशाप्रकारे आत्मनिर्भर होता येईल, यासह तत्सम विषयांवर निलोफर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

तुमच्या क्रीडा करियरविषयी काय सांगाल?आयपीएस अधिकारी किरण बेदी ह्या माझ्या आदर्श आहेत. त्यांच्या ‘डॅशींग’ वृत्तीचे किस्से ऐकून मी पोलिस होण्याचे ध्येय बाळगले. त्यानुसार, शिक्षण घेत असताना कबड्डी, कुस्ती, गोळाफेक, रस्सीखेच या मैदानी खेळांमध्ये मी सहभागी होत गेले. २०११ मधील पोलिस भरतीत केवळ एका गुणाने मी अयशस्वी ठरले. त्यानंतर लग्न झाले; पण पोलिस व्हायचेच, अशी खूणगाठ मनाशी बांधली. २०१४ मध्ये माझी मुलगी केवळ ७ महिन्याची असतानाही पोलिस भरतीत सहभागी होऊन मी यशस्वी झाले. वेटलिप्टींग, कुस्ती, गोळाफेक, बॉक्सींग हे मैदानी खेळही खेळणे सुरूच ठेवले.

नवोदित खेळाडूंनी यशस्वी होण्यासाठी नेमके काय करायला हवे ?कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सरावातील सातत्य, मेहनत आणि जीद्द या बाबी फार महत्वाच्या ठरतात. नवोदित खेळाडूंनी हे लक्षात घेऊन अपयशानंतर खचून न जाता जोपर्यंत आपण बाळगलेले उद्दीष्ट साध्य होत नाही, आपण यशस्वी होत नाही, तोपर्यंत प्रयत्न चालूच ठेवायला हवे. विशेषत: युवतींनी पोलिस दलात दाखल होण्याच्या दृष्टीने मैदानी खेळांमध्ये रुची घ्यायला हवी. यामुळे आपसूकच त्या शारिरीकदृष्ट्या सुदृढ होण्यासोबतच आत्मनिर्भर देखील होतील.

महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना अपेक्षित आहेत?महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. वाशिम जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी सुरू आहे.  महिला व मुलींनी देखील स्वत:ला सर्वच बाबतीत सक्षम करण्यासाठी स्वत:त बदल घडविणे अपेक्षित आहे. मानसिक, शारिरीक अत्याचार होत असेल तर त्याचा सुरूवातीलाच कठोर विरोध व्हायला हवा. पथनाट्यातून जनजागृती होणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत