कारंजा लाड (जि. वाशिम) : पती व सासर्याचा जेवणाचा डबा शेतात घेऊन जाणार्या महिलेस शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता तालुक्यातील दादगाव येथे घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. लता अमोल सावंत (२६ रा. दादगाव) यांनी पोलिसांत फिर्यादीत म्हटले की, सासर्याच्या मालकीच्या शेतात विहिरीचे काम सुरू असून, या कामावर रविवारी ती जात होती. या दरम्यान मार्गात आरोपींनी त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच फिर्यादीच्या मानेवर विळ्याने हल्ला करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रवींद्र गोविंदराव देशमुख याच्यासह एक महिला व मुलीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास बीट जमादार भीमराव चव्हाण करीत आहेत.
महिलेस मारहाण; गुन्हा दाखल
By admin | Updated: February 8, 2016 02:27 IST