शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी महिलाही सरसावल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:34 IST

वाशिम जिल्ह्यातील ९२ ग्रामसंघ, १७८६ समूह, कृषी सखी या माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी सरसावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहचविणे, माती परीक्षण, बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे आदी शेतीपयोगी कामात महिलाही समोर येत आहे. ‘उमेद’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ९२ ग्रामसंघ, १७८६ समूह, कृषी सखी या माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी सरसावल्या आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेत खरीप हंगामाचे पूर्वनियोजन करताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यावर भर दिला जात आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून यावर्षी शेतकºयांच्या बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला वाशिम जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानातील कृषी सखींच्या सहकार्याची जोड देण्यात आली आहे. जिल्ह्यात ९२ ग्रामसंघ व १७८६ समूह, १०० पेक्षा अधिक कृषी सखी असून शेतकºयांच्या बांधावर खत व बियाणे या उपक्रमात या महिला आपले कर्तव्य बजावत आहेत. कृषी विभागातर्फे कृषी सखींना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. शेतकºयांच्या बियाणे व खते यांच्या नोंदी घेणे, एकत्रित बियाणे व खते खरेदी करणे व त्याची कृषी विभागाने तयार केलेल्या संकेतस्थळवर नोंदी करणे तसेच शेतकºयांच्या शेतीमधून माती परीक्षण नमुने घेणे, गावस्तरावर शेतकºयांच्या बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे इत्यादी कार्य उमेद अभियानातील कृषी सखी, समूह व ग्रामसंघातील सदस्य करीत आहेत. कृषी क्षेत्रातही महिला पुढे आल्याने कौतुकाचा विषय बनला आहे. कृषी विभागातर्फे, खरीप हंगमाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना बी-बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठांची खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच घरगुती बियाणे तयार करताना नेमके काय केले पाहिजे यासंदर्भात कृषी विभागाने उमेद अभियानांतर्गतच्या कृषी सखींना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षीत झालेल्या या कृषी सखी आता कृषीविषयक कामे सहजरित्या पार पाडत आहेत. शेतकºयांच्या बांधावर खते, बियाणे पोहचविण्याच्या उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन नोंदी ठेवत आहेत. इतर क्षेत्राप्रमाणेच कृषीविषयक क्षेत्रातही महिला समोर आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र