शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची मंगरुळपीर नगरपालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:40 IST

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई नागरिकांना भेडसावित आहे. अशातच जिल्हा प्रशासनाची ही उदासिनता शहरातील नागरिकांचा गळा कोरडा करीत आहे. शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून शहरातील पाणी टंचाई  संदर्भात जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचीही तेवढीच उदासिनता असल्याने शहरवासियांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारा मोतसावंगा प्रकल्प पूर्णत: कोरडा पडला . यामुळे मंगरुळपीर शहरातील नगरपरिषदेचा पाणी पुरवठा अनेक दिवसांपासून बंद आहे. अशामध्येच हातपंप व विहिरी सुध्दा कोरडया पडल्यामुळे शहरातील नागरिक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहेत. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन नागरीक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहे. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन साडे चार कोटी रुपयांची सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरत्या स्वरुपाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली होती. आणि ती १५ मे पर्यंत कार्यान्वित करायची होती. परंतु काही अडचणीमुळे वाशिम जिल्हाधिकाºयांनी या योजनेला स्थगिती दिल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टँकर करीता प्रस्ताव पाठविला होता, परंतु अजुनपर्यंत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगरुळपीर शहरातील टँकरसाठी मंजुरी आदेश दिला नसल्याचे कळते. यावरुनच वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय मंगरुळपीर शहरातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात किती गंभीर आहे हे दिसून येते. मंगरुळपीर शहराला सोनाळा प्रकल्पातून तात्पुरत्या स्वरुपात पाणी पुरवठा व्हावा याकरिता शासनाकडून साडेचार कोटी रुपयांची योजना मंजुर झाली,मात्र या योजनेला तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिली व ती पुन्हा २७ एप्रिलला उठविली. असे पत्र मंगरुळपीर नगर परिषदेला २ मे रोजी प्राप्त झाले. ज्या योजनेला पूर्ण करण्याकरिता किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो आता ती योजना अवघ्या १३ दिवसात कशी पूर्ण होई असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई नागरिकांना भेडसावित आहे. अशातच जिल्हा प्रशासनाची ही उदासिनता शहरातील नागरिकांचा गळा कोरडा करीत आहे. स्थानिक आमदारांनी याबाबत एक आढावा बैठक घेवून व ३ लाख रुपयांचा निधी देवून आपल्या कानावर हात ठेवले व परत येवून बघितले सुध्दा नाही. असेच चालले तर शहरातील जनतेने काय करावे असा सवाल ही सध्या नागरिक करीत आहेत.

 

आम्ही शहरात पाणी पुरवठा करण्याकरिता प्रशासनाकडे पाणी टँकरसाठी प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताचक्षणी शहरात टँकरने ताबडतोब पाणी पुरवठा केला जाईल. तसेच सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरती पाणी पुरवठा योजनेला आम्ही शासनाकडे मुदत वाढीची मागणी केली आहे.- डॉ. मेघना वासनकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी