शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुजलाम्, सुफलाम् अभियान : कामाअभावी २८ जेसीबी मशिन जागेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 15:09 IST

‘सुजलाम, सुफलाम वाशिम या अभियानांतर्गत भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे २८ जेसीबी मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या कामे नसल्याने जवळपास १५ जेसीबी मशिन जागेवरच थांबून आहेत.

सुजलाम्, सुफलाम् अभियान : कामांचे नियोजन करण्याच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविले जात आहे. या अभियानांतर्गत भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे २८ जेसीबी मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या कामे नसल्याने जवळपास १५ जेसीबी मशिन जागेवरच थांबून आहेत.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. या कामी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला आहे. सुरूवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव व कारंजा तालुक्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. बीजेएसच्यवतीने २८ जेसीबी मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. या अभियानाचा शुभारंभ १३ नोव्हेंबर रोजी झाला असून, तेव्हापासून पहिल्या व दुसºया टप्प्यात रिसोड तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत पाचही तालुक्यात समतल चर खोदकाम यासह जलसंधारणाची विविध कामे पूर्ण करण्यात आली. सध्या जलसंधारणाची कामे उपलब्ध नसल्याने १५ जेसीबी मशिन जागेवरच थांबून आहेत. यासंदर्भात बीजेएसच्या समन्वयकांनी जलसंधारणाची कामे उपलब्ध करण्याची मागणी कृषी विभागाकडे नोंदविली आहे. या पृष्ठभूमीवर पाणलोटातील ढाळीच्या बांधाची कामे त्वरीत उपलब्ध करून सदर मशिन कामांवर जातील, याचे नियोजन तात्काळ करावे आणि तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सहाही तालुका कृषी अधिकारी तसेच वाशिमचे उपविभागीय कृषी अधिकाºयांना दिल्या.भारतीय जैन संघटनेच्या २८ जेसीबीपैकी आज रोजी जवळपास १५ जेसीबी जागेवरच आहेत. तलावातील गाळ काढणे, ढाळीच्या बांध बंदिस्ती किंवा सलग समतल चर खोदकाम आदी कामांसाठी जेसीबी मशिनचा वापर केला जातो.  या अनुषंगाने ढाळीचे बांध बंदिस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे. त्यामुळे जेथे जमिन, शेत हे रिकामे आहे, तेथे जलसंधारणाची कामे सुरू करण्याची मागणी बीजेएसच्या समन्वयकांनी कृषी विभागाकडे नोंदविली आहे. जेसीबीची मागणी नोंदविण्याचे आवाहनआजच्या स्थितीत जरी जलसंधारणच्या कामांसाठी १०० टक्के शेतजमिन किंवा अन्य ठिकाणे उपलब्ध नसतील; परंतू २० ते २५ टक्के शेतजमिन रिकामी असून, तेथे ३१ मार्च २०१९ पूर्वी कामे पूर्ण होण्यासाठी तातडीने कामे सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी, सदर सर्व कामांसाठी आणखी काही  जेसीबीची मागणी भारतीय जैन संघटनेच्या तालुका समन्वयकाकडे नोंदवावी, असे आवाहनही जिल्हा समन्वयकांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम