शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वाशिमच्या उपअभियंत्यांची चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:09 IST

वाशिम : गांधीनगर (गुजरात) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धेत बटरप्लाय प्रकारात महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या ए.एम. खान यांनी नवी दिल्लीच्या संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गांधीनगर (गुजरात) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धेत बटरप्लाय प्रकारात महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या ए.एम. खान यांनी नवी दिल्लीच्या संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले ए.एम. खान यांचा या चमकदार कामगिरीबद्दल १८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी महासंघाने सत्कार केला.आॅल इंडिया  सिव्हिल सर्व्हिसेस अंतर्गत गांधीनगर (गुजरात) येथे शासकीय अधिकारी संवर्गातील जलतरण स्पर्धा पार पडल्या असून, यामध्ये देशातील विविध राज्याचे संघ सहभागी झाले होते. बटरप्लाय या प्रकारात महाराष्ट्र संघात ए.एम. खान यांची निवड झाली होती. अंतिम सामन्यात नवी दिल्लीच्या स्पर्धकाचा पराभव करीत खान यांनी विजेतेपद पटकाविले. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत वाशिमसारख्या छोट्याशा जिल्ह्यातील अधिकाºयाने विजेतेपद पटकाविणे ही बाब जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात कौतुकास्पद मानली जात आहे. खान यांनी यापूर्वीदेखील राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा, सागरी जलतरण स्पर्धेत मालवण, रत्नागिरी येथे ३ किमी अंतर, संक रॉक ते गेट वे आॅफ इंडिया, मुंबई असे ५ किमी अंतर, भारतीय नौसेना ट्रेनिंग सेंटर ते प्रांज रिफ कुलाबा मुंबई असे ६ किमी अंतर स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद पटकावून देणाºया खान यांचा महाराष्ट्र शासनाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरव केलेला आहे. या चमकदार कामगिरीबद्दल वाशिम येथे १८ जानेवारीला जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी महासंघाने उपअभियंता खान यांचा गौरव केला.

टॅग्स :washimवाशिमSwimmingपोहणे