०००००००००००
रोजगार सेवकांना विमा संरक्षणच नाही
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर कार्यरत मजूर, रोजगार सेवक यांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेने वारंवार राज्य शासनाकडे केली आहे. अद्याप विमा संरक्षण देण्यात आले नाही. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी रोजगार सेवक संघटनेने शनिवारी केली.
०००००००००००
लाभार्थींना घरकुल अनुदान वितरण
वाशिम : उपलब्ध निधीनुसार जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींना अनुदान वितरण केले जात असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. विनोद वानखेडे यांनी सांगितले.
००००००००
रेतीघाटाचा लिलाव करण्याची मागणी
वाशिम : गत चार वर्षांपासून रेतीघाटाचे लिलाव बंद असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. रेतीघाटाचे लिलाव करण्याची मागणी संतोष सरकटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.
००००००००००
आयुडीपी कॉलनीत पथदिवे बंद
वाशिम : नवीन आययुडीपी कॉलनीतील काही पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य असते. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी शनिवारी केली.
०००००
शौचालयाचा वापर करण्याकडे दुर्लक्ष
वाशिम : केनवड परिसरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
००००
संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशिम : वनोजा येथे शनिवारी एक जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या माहितीचे संकलन आणि कोरोना चाचणी
केली जाणार आहे.