शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या पणत्या बनविणारी कुभांरांची ‘चाके’ थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 15:36 IST

मातीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागाणी नसल्याने जिल्हयातील बहुतांश कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केलयने कुंभारांची ती गरगर फिरणारी चाके थांबलेली दिसून येत आहेत.

- नंदकिशोर नारे

वाशिम:  हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा समजला जाणारा सण दिव्यांचा सण म्हणजे  दिपावली. या सणात मातीच्या पणत्यांच्या महत्वाचे स्थान असून कलात्मक बदलामुळे मात्र ते महत्व बाजारात विक्रीस आलेल्या ‘टेराकोटा’ पणत्यांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मातीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागाणी नसल्याने जिल्हयातील बहुतांश कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केलयने कुंभारांची ती गरगर फिरणारी चाके थांबलेली दिसून येत आहेत. कुंभारच खुद्द आकर्षित, रेखीव दिसणाºया ‘टेराकोटा’च्या पणत्या खरेदी करुन विक्री करीत आहेत.वाशिम शहरातील जवळपास ९५ टक्के कुंभारांनी दिवाळीसाठी लागणाºया पणत्या न बनिवता कलकत्ता येथील व्यापाºयांकडून ५०० ते ६०० रुपये हजाराने विकत घेवून त्याचीच ९०० ते १००० रुपये दराने विकून कमाई करीत आहेत. तर काही मोजके कुंभार पारंपारिक व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी काही कुंंभार मात्र आधुनिकतेशी लढाई करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे काही वर्षांनतर मातीच्या पणत्या नामशेष होणार असल्याचे चिन्ह आहे.  वाशिम शहरात ३० कुंभार असून दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मी मुर्त्या, खेळभांडी बनवितात.  दिपावलीसाठी काही मोजके कुंभार वगळता अनेकांनी पणत्या बनविणे बंद केले आहे. बाजारात गत ४ ते ५ वर्षापूर्वी मातीच्याच पणत्या विक्रीस यायच्यात.   टेराकोटाच्या पणत्या आल्याने  २५ कुंभारांचे पणत्या बनविणारे हात थांबले आहेत. एक कुंंभार ५० हजार पणत्या बनवून विकायचा आज २५ कुंभारांचे प्रत्येकी ५० हजार पणत्या बनविणे थांबल्याने  १२ लाख ५० हजार पणत्या व ग्रामीण भागातील १६ ते १७ लाख पणत्या बनविणारे कुंभारांचे हात थांबले आहेत.  तरी काही कुंभार पारंपारिक व्यवसायाला टिकवून आधुनिकतेशी लढाई करतांना दिसून येत आहे. दिपावलीत दिवा कोणताही असो, खरे महत्व असते ते प्रज्वलित केलेल्या ज्योतीचे एवढे मात्र नक्की!

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक