शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

भवसागर माऊली पालखीचे नागरतास येथे स्वागत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:42 IST

मालेगाव : अकोला ते श्रीक्षेत्र पंढरपुरकडे जाणाºया श्री भवसागर माऊली चॅरीटेबल ट्रस्ट पालखीचे नागरतास येथे सोमवारी सायंकाळी आगमन झाले असता, भाविक व लांडकर परिवाराच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्दे श्री भवसागर माऊली चॅरीटेबल ट्रस्ट अकोला येथील पालखीचे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आगमन झाले. पालखी जगदंबा देवी संस्थान नागरतास येथे पोहचली असता त्या ठिकाणी आरती, किर्तनाचा कार्यक्रम झाला. मागील अनेक वर्षांपासुन हभप वै सखारामजी लांडकर यांच्या स्मरणार्थ सुभाष लांडकर हे पालखीच्या भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था सांभाळीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : अकोला ते श्रीक्षेत्र पंढरपुरकडे जाणाºया श्री भवसागर माऊली चॅरीटेबल ट्रस्ट पालखीचे नागरतास येथे सोमवारी सायंकाळी आगमन झाले असता, भाविक व लांडकर परिवाराच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. भाविकांनी दर्शन घेऊन पुजा अर्चा केली. पालखीत ४०० वारकरी मंडळी सहभागी आहेतआषाढी एकादशी निमीत्त श्रीक्षेत्र पंढरपुर कडे जाणाºया श्री भवसागर माऊली चॅरीटेबल ट्रस्ट अकोला येथील पालखीचे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आगमन झाले. सुशोभीत रथावर माऊलीची मुर्ती ठेवण्यात आलेली ही पालखी नागरतास येथे येत असतांना भाविकांनी पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले. पालखीमध्ये भगव्या पताका हाती असलेले वारकरी, सुशोभीत माऊलीचा रथ, टाळमृदुंगाच्या सोबत हरिनामाचा गजर करणारी भजनी मंडळी तसेच महिला वारकरीसुध्दा सहभागी होते. पालखीचे आयोजक ह.भ.प. नाना उजवने यांनी १९८९ पासुन या पालखीला सुरुवात केली असुन पालखी सुरू होण्यापुर्वी सुरूवातीचे १७ वर्षे वाहनाने १०० ते १५० वारक-यांना वारी घडवत तर गेल्या २८ वर्षापासून अकोला ते श्रीक्षेत्र पंढरपुर पायदळ वारी सुरु आहे.  पालखी जगदंबा देवी संस्थान नागरतास येथे पोहचली असता त्या ठिकाणी आरती, किर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हभप वै. सखाराम पाटील लांडकर यांचे स्मृती प्रित्यर्थ सुभाष लांडकर यांच्या वतीने वारक-यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था केली होती. यावेळी नारायण लांडकर, गजानन लांडकर, सदाशिव लांडकर, वसंता लांडकर, विठ्ठल लांडकर, स्वप्नील लांडकर, किशोर लांडकर, नितीन लांडकर,  राहुल लांडकर, दशरथ कड, तुकाराम कुटे, भिमराव मुठाळ, सोपान  लांडकर, नंदु पाटील, पांडुरंग लांडकर, रणधीर लांडकर, संकेत लांडकर,यांच्यासह गावातील नागरीकांची उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासुन हभप वै सखारामजी लांडकर यांच्या स्मरणार्थ सुभाष लांडकर हे पालखीच्या भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था सांभाळीत आहेत. नागरतास येथे मुक्कामी असणा-या पालखीतील वारकरी मंडळीसह ८०० ते ९०० लोकांनी या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतला तर  दुस-या दिवशी सकाळी तुकाराम कुटे यांचे वतीने वारकºयांसाठी चहापाण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर पालखी मालेगाव येथे आली असता शहरवासी आणि संत गजानन महाराज पायदळवारीतर्फे मूलचंद ओझा तसेच इतर भाविकांकडून चहा वाटप करण्यात आला.

टॅग्स :Malegaonमालेगांवwashimवाशिम