शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

पिडित महिला, बालकांच्या तक्रारीसाठी तयार केली ‘वेबसाईट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:08 IST

पिडित महिला, बालकांच्या तक्रारीसाठी तयार केली ‘वेबसाईट’!

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर राज्यभरात गेल्या ५३ दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. यामुळे संपूर्ण कुटूंब दीर्घकाळ एकत्र आल्याने कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे; मात्र अन्याय होऊनही पिडित महिला व बालके तक्रार करायला कार्यालयात येऊ शकत नसल्याने त्यांची सोय व्हावी, या उद्देशाने येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांनी स्वखर्चाने ‘वेबसाईट’ तयार केली. राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येतही दिवसागणिक वाढच होत आहे. त्यामुळेच ३ मे पर्यंत असलेल्या ‘लॉकडाऊन’ची मुदत १७ मे आणि आता ३१ पर्यंत वाढविण्यात आली. यामुळे अनेकांचे संपूर्ण कुटूंब दीर्घकाळ घरातच एकत्र राहत आहे. अशास्थितीत पुर्वीपासून असलेला कौटुंबिक कलह वृद्धींगत होण्याची शक्यता असून पती-पत्नीमधील वाद, विधवा महिलांना कुटूंबातील अन्य सदस्यांकडून होणारा त्रास, विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ आदी स्वरूपातील घटना बळावण्याचा धोका आहे. यामुळे महिला आणि बालकांना पिडा सहन करावी लागू शकते. असे असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने पिडीत महिला व बालके कायद्याचा आधार किंवा समुपदेशनाची सेवा घेण्यास तालुका, जिल्हा कार्यालयात येण्यासाठी घराबाहेर पडण्यास असमर्थ ठरताहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी तक्रार करण्यासाठी ‘वेबसाईट’ तयार केली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ आणि मतदार जागृतीसाठी मानवी लोगो साकारून ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जिल्ह्याचे नाव झळकविल्यानंतर पिडित महिला व बालकांसाठी ‘वेबसाईट’ तयार केल्याप्रती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनीही राठोड यांचे कौतुक केले.

अशी आहे ‘वेबसाईट’!अन्याय, अत्याचार होऊनही घराबाहेर पडून तक्रार करता येत नसल्यास संबंधित पिडित महिला व बालकांना ‘डब्ल्यूसीडी वाशिम डॉट निलेश टॉक डॉट कॉम’ या वेबसाईटवर तक्रार नोंदविता येईल. तक्रारीचा अर्ज आॅनलाईन पद्धतीने अपलोड झाल्यानंतर कुठल्याही क्षणी तक्रार निकाली निघाली किंवा नाही, हे कळू शकेल, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम