शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विपरीत हवामानाचा तूर पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:45 IST

फुले गळण्यासह किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

-लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गत पाच दिवसांपासून पश्चिम वºहाडात दिवसा उन्हाचा कडाका, तर रात्री थंडी वाढत आहे. या विपरीत वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात सापडले आहे. या वातावरणात फुले गळण्यासह किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांनी बेजार केले आहे. मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरणीला उशीर झाला, तर पावसाने खंड दिल्याने पिके संकटात सापडून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आॅगस्ट आणि सप्टेंबरच्या पावसाने पिकांना तारले. उडीद, मूग काढणीवर असताना आलेल्या पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर शेतकरी उसंत घेत नाही तोच, सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने तांडव घालत शेतातील उभ्या सोयाबीनसह काढून ठेवलेल्या सोयाबीनचा सत्यानाश केला. या संकटातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांच्या आशा आता खरिपातील दीर्घकालीन पीक असलेल्या तुरीवर लागल्या आहेत. हे पीक शेंगा, फुलांवर असताना वातावरणातील बदल या पिकासाठी घातक ठरत आहे. दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री पडणारी थंडी या पिकासाठी घातक ठरत आहे. प्रामुख्याने पश्चिम वºहाडातील हे वातावरण या पिकासाठी अधिकच धोकादायक ठरत आहे. या भागात सोयाबीननंतर सर्वाधिक क्षेत्र हे तुरीच्या पिकाचेच आहे. त्यामुळे या पिकावर शेतकºयांचे लक्ष लागले आहे. या वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणारी हिरवी अळी, पाने, फुले गुंडाळणारी अळी, बड विव्हिल, पिसारी पतंग, फुलकिडे, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीवर नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी करणे, हाच पर्याय असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सध्याच्या वातावरणामुळे तुरीवर शेंगमाशी, शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, बड विव्हिल आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावी.-भरत गीते,कृषी शास्त्रज्ञपं.दे.कृ.वि., अकोला.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती