शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील पाण्याच्या विहिरी बुजल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 18:00 IST

वाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पक्क्या पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत. यामागे प्रशासनाच्या बेफिकीरीसोबतच नागरिकांची उदासिनताही कारणीभूत मानली जात आहे. नव्या वसाहती विकसीत होण्यापूर्वी वाशिम शहरातील देवपेठ, गणेशपेठ, शुक्रवारपेठ, माहुरवेस, गोंदेश्वर, काळेफाईल, अल्लडाप्लॉट आदी जुन्या वसाहतींमध्ये पक्क्या पाण्याच्या विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यावरच नागरिकांची पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणाºया पाण्याचीही गरज भागत असे. कालांतराने मात्र वाशिममध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होवून मुबलक पाणाी मिळायला लागल्याने नागरिकांनी विहिरींच्या जतनाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. विशेष गंभीर बाब म्हणजे कधीकाळी पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गणल्या जाणाºया विहिरी अडथळा ठरायला लागल्याने अनेक विहिरी दैनंदिन घरातून बाहेर पडणाºया कचरा टाकून बुजविण्यात आल्या; तर काही विहिरी ‘ले-आऊट’ विकसीत करित असताना बुजल्या गेल्या. त्यामुळे सद्या शहरातील विहिरींची संख्या जेमतेम असून दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया भीषण पाणीटंचाईवर मात करणे यामुळे अशक्य ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिम