शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोनल प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय; पाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीतून पाण्याची गळती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:08 IST

वाशिम : सोनल प्रकल्पावरून टाकण्यात आलेल्या आठ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी ‘लिकेज’ असून त्यातून बारोमास पाण्याची गळती सुरू असते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोनल प्रकल्पावरून टाकण्यात आलेल्या आठ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी ‘लिकेज’ असून त्यातून बारोमास पाण्याची गळती सुरू असते. हा प्रकार प्रखर उन्हाळ्यात दिवसांत सद्याही सुरू असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम सिंचन प्रकल्पावरून आठ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. बोराळानजीक असलेल्या कार्ली या गावाच्या फाट्यापासून गावाकडे जाताना लागणाºया नदीवर मोठा पूल असून आसपासच्या परिसरातून ही जलवाहिनी गेलेली आहे. काहीठिकाणी जलवाहिनीला लिकेज झाल्याने पाण्याची गळती सुरू आहे. बाराही महिने सुरू असणाºया या प्रकारामुळे सोनल प्रकल्पातील कोट्यवधी लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. काहीठिकाणी अवैधरित्या जलवाहिनीला छीद्र पाडून पाण्याचा गैरवापर केला जात असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, यावर्षी एकीकडे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना दुसरीकडे होत असलेला पाण्याचा अपव्यय रोकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लक्ष पुरवत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.  आठ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीला अनेक ठिकाणी ‘लिकेज’ असून ते दुरूस्त करण्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करित आहे. यामुळे बाराही महिने पाण्याची गळती होवून कोट्यवधी लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. - नामदेव नरहरी वानखेडेउपसरपंच, कार्ली ग्रामपंचायत

टॅग्स :washimवाशिमwater shortageपाणीटंचाई