शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 15:59 IST

पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

वाशिम : पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. परंतू, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती तसेच जिल्हास्तरीय यंत्रणकडे प्रस्ताव येत नसल्याची माहिती समोर येत आहे तर काही ठिकाणी प्रस्ताव सादर करूनही मंजूरी मिळत नसल्याची माहिती आहे. पाणीटंचाई संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेतही सदस्य, पदाधिका-यांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. काही प्रश्नांची सोडवणूक केली जाते तर काही प्रश्न प्रलंबितच राहतात. गोलवाडी व निंबी येथील मागासवर्गीय वस्ती, मथूरा तांडा येथे पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. परंतू, अद्याप मंजूरी मिळाली नसल्याची माहिती आहे. गोलवाडी येथील मागासवर्गीय वस्तीत पाणीपुरवठ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. निंबी येथील मागासवर्गीय वस्ती तसेच मथूरा तांडा येथेही पाणीपुरवठा योजना नसल्याने घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपिट करावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी