शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:02 IST

जउळकारेल्वे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जऊळका रेल्वे येथे तीन गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कजउळकारेल्वे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जऊळका रेल्वे येथे तीन गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणमार्फत साधारणत: १८ वर्षापुर्वी जउळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी जउळका रेल्वे येथे जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र व अन्य कामांचा शुभारंभ केला होता. सदर योजनेंतर्गतचे काम अतिशय संथगतीने करण्यात आले. दोन वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. आता तर जऊळका रेल्वे येथे पाणीपुरवठाही होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गावातील हातपंपावर पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जउळका गावालगत काटेपुर्णा नदीवर चाकातिर्थ प्रकल्पाची निर्मिती झाली. हा प्रकल्प सद्यस्थितीत तुडूंब भरलेला आहे. गावालगतच प्रकल्प असल्यावरही जउळका रेल्वे येथील नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दरवर्षी लाखो रुपये खर्च करून थातूरमातूर पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा नसल्याने या योजनेवर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकºयांमधून उमटत आहेत. कायमस्वरुपी उपाययोजनेचा अभावपावसाळा संपत नाही; तेच जउळका रेल्वे येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने तीन गावे पाणीपुरवठा योजना अंमलात आली. मात्र, योग्य नियोजनाअभावी सदर योजनाही जऊळकावासियांची तहान भागविण्यात यशस्वी होऊ शकली नसल्याचे वास्तव आहे. जऊळका रेल्वे येथील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नियमित पाणीपुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अन्य यंत्रणेने नियोजन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी