मालेगाव - तालुक्यातील केळी गावात ७ विहिरी , ४ कुपनलीका असूनही गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . गावाची पाणीपुरवठा योजना मागील १८ वषार्पासून बंद असल्याने सर्वसुविधा असतांना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत. केळी ८०० लोकवस्तीच गाव . गावातील असलेल्या हातपंप व विहिरींना पाणी नाही .त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . गावाजवळ मालेगाव लघु पाटबंधारे योजनेचा तलाव आहे . अवैध पानीउपस्सामुळे हा तलाव कोरडा झाला आहे .त्यामुळे गावातील भूजल पातळीत घट झाली आहे . सद्या ग्रामस्थ दीड किलोमीटर अंतरावरुन पाणी आणतात . गावाला टंकर ने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे . मालेगाव लघु पाटबंधारे योजनेच्या प्रकल्पाच्या अप्पर स्ट्रिमला विहीर खोदुन पाणीपुरवठा योजना सुरू केली होती .ती १८ वर्षापासून बंद आहे . गावात नविन विहीर खोदल्यास पाणी लागते त्यामूळे नविन विहीर खोदावी असा प्रस्ताव ग्राम पंचायत ने पंचायत समितीला दिला आहे
पाणीपुरवठा योजना १८ वषार्पासून बंद
By admin | Updated: April 24, 2017 14:11 IST