शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:46 IST

Washim News वीज पुरवठा तोडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.    

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे विद्युत देयकांच्या थकबाकीचा एकूण आकडा ७२ कोटींपेक्षा अधिक झालेला आहे. यामुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांचा वीज पुरवठा तोडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.    महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदार वीज ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यात आता ग्रामपंचायतीही ‘रडार’वर आल्या आहेत. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी १५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीसंबंधी अवगत केले आहे. वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचा विद्युत देयकापोटी १.६८ कोटी; तर विद्युत पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीपोटी ९.८५ कोटी असे एकूण ११.५३ कोटी रुपये थकीत आहेत. याशिवाय कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.५४, मालेगाव ११.८२, मंगरूळपीर १०.२१, मानोरा १३.९६ आणि रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.२९ कोटी रुपयांची थकबाकी झालेली आहे. संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही विद्युत देयकांची थकबाकी अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर नाइलाजास्तव पाणीपुरवठा आणि विद्युत पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर सर्व कामे सुरळीतपणे केली जात आहेत. मात्र, विद्युत देयक भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब गंभीर आहे.- आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण