शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुरळा धरणातून मालेगावला पाणीपुरवठा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:24 IST

मालेगाव (वाशिम) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हे काम विहित मुदतीत पूर्ण केले असून १६ एप्रिलपासून मालेगावकरांना याव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. 

ठळक मुद्दे चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा धरणात पाणी सोडण्यासाठी १.३४ कोटी रुपयांचा निधी खर्चून पाईपलाईन टाकण्यात आली. संबंधित यंत्रणेने दिवसरात्र मेहनत घेवून पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत पूर्ण केले आणि १६ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

मालेगाव (वाशिम) : शहराला पाणीपुरवठा करणाºया कुरळा प्रकल्पाची पाणीपातळी शून्यावर पोहचल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू होती. दरम्यान, हा प्रश्न निकाली काढण्याकरिता चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा धरणात पाणी सोडण्यासाठी १.३४ कोटी रुपयांचा निधी खर्चून पाईपलाईन टाकण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हे काम विहित मुदतीत पूर्ण केले असून १६ एप्रिलपासून मालेगावकरांना याव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान-मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी चाकातिर्थ प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने या प्रकल्पातून कुरळा धरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसह इतर संबंधित यंत्रणांकडे पाठविला होता. त्यास १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि योजनांतर्गत काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यानुसार, ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर पाईपलाईन टाकण्याच्या कामाची जबाबदारीस सोपविण्यात आली होती. त्यानुसार, संबंधित यंत्रणेने दिवसरात्र मेहनत घेवून पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत पूर्ण केले आणि १६ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव