तळप बु. : गारपीट व अतवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीला वर्ष उलटत आले तरी, तळप बु. परिसरातील शेतकर्यांना गारपीट व अतवृष्टीची मदत मिळाली नाही. शासनाकडून जाहीर झालेली मदत त्वरीत न मिळाल्यास तळप बु. येथील धरणात जलसमाधी घेण्याचा ईशारा परिसरातील शेतकर्यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.रामतीर्थ, कार्ली, कारखेडा येथील काही शेतकर्यांना आजपर्यंत शासनाची मदत मिळाली नसल्याची तेथील शेतकर्यांची तक्रार आहे. मागील वर्षी झालेल्या गारपीट व अतवृष्टीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. परंतु बर्याच शेतकर्यांनी ही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाही. आपल्या खात्यात रक्कम जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी बँक , तहसील कार्यालय आणि तलाठी यांच्याकडे चकरा मारतोय. परंतु त्याचा उपयोग होत नाही. रामतीर्थ येथील शेतकरी सुधाकर मोतीराम गांवडे यांच्या नावावर २ हजार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर १0 हजार आर्थिक मदत तहसील दफ्तरी नोंद आहे. पण त्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत जमा झाली नाही. त्वरित मदत न मिळाल्यास तळप बु. येथील धरणात जलसमाधी घेवू असा ईशारा सुधाकर मोतीराम गावंडे, माणिकराव भगवंत गावंडे, विठ्ठल देवराव गांवडे आणि ब्रह्म परशराम रत्ने यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
अनुदानासाठी जलसमाधीचा ईशारा
By admin | Updated: September 26, 2014 00:33 IST