शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:10 IST

रिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याने महिला किलोमीटर अंतरावरून पाणी आणत गरजा भागवित आहेत. गावात जलस्त्रोत नसल्याने गावालगत असलेल्या तलावरील विहिरीचे दुषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.वाकद येथे नळगंगा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत होता; परंतु ही योजना सहा महिन्यांपासून ठप्प झाल्याने पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. या ठिकाणी  नळ योजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरे कोणतेच जलस्त्रोत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावालगत असलेल्या  विहिरीवरून लोक पाणी आणून गरजा भागवित आहेत. त्यापैकी गावलगतच्या तलावाजवळ असलेल्या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे; परंतु वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थांना पर्याय नसल्याने हे दुषित पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नळगंगा योजनेद्वारे गावातील विहिरीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो; परंतु या योजनेची जलवाहिनी काही ठिकाणी अनेक दिवसांपासून फुटली आहे. ती दुरुस्त करण्याची तसदी ग्रामपंचायकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईच सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थ तलावावरील विहिरीचे दुषित पाणी पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात असतानाही ग्रामपंचायतकडून अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीत कारभारामुळेच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, दुषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे मत गावातील संतोष बोडखे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी