शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; उपाययोजनांची व्याप्तीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 17:16 IST

वाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. येथे पिण्याच्या पाण्याचा अपवाद वगळता वापरण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असून, अन्य काही गावातही पाण्यासाठी नागरिकांची पायपिट सुरूच आहे.गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, आता पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आहे. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मानोरा तालुक्यात गलमगाव, पाळोदी, रिसोड तालुक्यात भर जहॉगीर परिसर, मालेगाव तालुक्यातील बोराळा, राजूरा यासह डोंगराळ भागातील नागरिक, वाशिम तालुक्यातील माळेगाव, भोयता परिसर, कारंजा तालुक्यातील गिर्डा, बांबर्डा परिसर आदी भागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नागरिकांची मागणी आणि पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजनांची व्याप्ती वाढविल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत ४५ गावांत टँकर मंजूर असून, १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ४५ टँकरमध्ये वाशिम तालुक्यातील १६ गावे, मालेगाव तालुक्यात सात, रिसोड चार, मंगरूळपीर नऊ, मानोरा पाच आणि कारंजा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याप्रमाणेच २५३ विहिर अधिग्रहणामध्ये वाशिम तालुक्यात ५९, मालेगाव ३१, रिसोड ५०, मंगरूळपीर ५४, मानोरा १८ आणि कारंजा तालुक्यात ३१ अशा ठिकाणचा समावेश आहे. या टंचाईग्रस्त गावांत टँकर किंवा विहिर अधिग्रहणामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी वापरण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या टंचाईग्रस्त गावांव्यतिरिक्त रिसोड तालु्क्यातील भर जहॉगीर परिसरातील पाच गावे, लोणी परिसरात तीन गावे, कारंजा तालुक्यातील हिवरा, गंगापूर, आखतवाडा, मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील तीन गावे आदी गावांमध्येही पाण्यासाठी नागरिकांना दूरवर पायपिट करावी लागत आहे. गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असले्ल्या शेतातील विहिरींवरून भर उन्हात पाणी आणण्याची कसरत महिलांना करावी लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई