शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या काळात आडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 20:48 IST

आडोळ लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे परिसरात पाणीटंचाई देखील जाणवत आहे. असे असताना पार्डीतिखे गावानजिक धरणातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्देपाईपलाईन लिकेजशेतक-यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा (वाशिम): येथील आडोळ लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे परिसरात पाणीटंचाई देखील जाणवत आहे. असे असताना पार्डीतिखे गावानजिक धरणातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने कानाडोळा केल्याने शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.यावर्षी उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे आडोळ लघुप्रकल्पात शिल्लक असलेले संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले असून प्रकल्पासाठी जमिनी देणा-या शेतक-यांना पिकांसाठी पाणी देणे बंद करण्यात आले आहे. शेतक-यांनी जिल्हाधिका-यांमार्फत प्रकल्पातील पाणी मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केले; परंतु रिसोड, शिरपूर, रिठद या गावांकरिता पाणी राखीव ठेवावे लागत असल्याने सिंचनासाठी यंदा पाणी मिळणार नाही, अशी भुमिका प्रशासनाने घेतली आहे. दुसरीकडे पार्डीतिखे गावाजवळ आडोळ प्रकल्पातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा राजरोसपणे अपव्यय होत आहे. याशिवाय इतरही ८ ते १० ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे विशेषत: शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिका-यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा, अशी मागणी जोर धरत आहे. .

पाईपलाईन लिकेज असल्याने होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाबद्दल रिसोड नगर परिषदेच्या अभियंत्यांना अनेकवेळा कळविण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून याप्रकरणी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ रखडला आहे.- बबनराव मिटकरी, शेतकरी, बोराळा जहाँ.

टॅग्स :Waterपाणी