शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यातील २० गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:34 IST

Risod Water scarcity News : तीन ठिकाणी बोअर व विहिर अधिग्रहण करण्यात आले तर करंजी गरड येथे टँकर सुरु करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसालीपुरा प्रभागातील जलवाहिनीचा मुद्दा

रिसोड : रिसोड तालुक्यातील २० गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, तीन ठिकाणी बोअर व विहिर अधिग्रहण करण्यात आले तर करंजी गरड येथे टँकर सुरु करण्यात आले आहे.उन्हाळ्याच्या सुरूवातीला रिसोड तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील करंजी गरड या गावाला दरवर्षी उन्हाळ्यात टंंकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदादेखील करंजी गरड येथे पाणीटंचाइ असल्याने टँकर सुरु करण्यात आले आहे. गत वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी अनेक गावात पाणीटंचाईची तिव्रता देखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी ३४ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास ४ ठिकाणी विहिर व बोअर अधिग्रहण केले होते तर एका ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा १० विहीरी व एक बोअर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील

धोडप बु. ,लोणी बु, वडजी, पेनबोरी, देगाव, भोकरखेडा,वाडीरायताळ, गोवर्धन,सवड, येवती, मसलापेन, मांगुळ झनक,लोणी खु, आसोला, व्याड, शेलगाव राजगुरे, चाकोली, कवठा, गणेशपूर, पांचाबा या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावातील महिलांना शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकºयांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. नळ योजना दुरूस्ती मध्येव्याड, शेलगाव, चाकोली, कवठा, गणेशपुर, पाचांबा ही गावे आहेत.

यावर्षी तहसिल कार्यालयात पाच तर पंचायत समिती कार्यालयात सात असे एकुण १२ गावातुन विहीर व बोअर अधिग्रहणा करीता प्रस्ताव आले आहेत.तसेच गत वर्षी १३ मे पर्यंत करंजी गरड येथे टँकर सुरु होते. तर ३ विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले होते. 

रिसोड तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारच कमी प्रमाणात पाणीटंचाई आहे. काही गावातील विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढु तसेच करंजी गरड या गावात नियमित टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

- संतोष आष्टीकरगटविकास अधिकारी, पं स रिसोड.

टॅग्स :Risodरिसोडwater scarcityपाणी टंचाईwashimवाशिम