शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पार्डी ताडवासियांची पाण्यासाठी वणवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:42 IST

पार्डी ताड (वाशिम) : उन्हाळ्याच्या झळा तीव्र होण्यापूर्वीच पार्डी ताड येथील कूपनलिका, विहिरीत कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थ आतापासूनच टँकर विकत घेत असल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम) : उन्हाळ्याच्या झळा तीव्र होण्यापूर्वीच पार्डी ताड येथील कूपनलिका, विहिरीत कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थ आतापासूनच टँकर विकत घेत असल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील नळ योजनेची विहीर तीन महिन्यांपूर्वीच आटली. त्यामुळे नळयोजना बंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी खासगी विहीरी, हातपंपाचा आधार घेत पाणी उपसून गरजा भागविल्या. आता गेल्या महिनाभरापासून येथील हातपंप आणि विहिरीही कोरड्या पडल्याने गावात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. काही लोक टँकर विकत घेऊन तहान भागवित आहेत; परंतु रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाºयांची मोठी पंचाईत झाली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी गोरगरीब कुटूंबे मुलाबाळांसह वणवण भटकून पाणी आणत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि मजुरांच्या कामांवरही परिणाम होत असल्याने परिवारांवर उपासमारीची पाळीही येऊ लागली आहे. यावर पर्याय म्हणून काही परिवार रात्रीअपरात्री जीव धोक्यात घालत शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे. पार्डी ताड येथे गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सोसावे लागत असताना प्रशासनाकडून ही समस्या मिटविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत.  ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात पार्डी ताड येथे गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ वणवण भटकत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी कुठलेही प्रयत्न प्रशासनाकडून अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी १८ फेब्रुवारी रोजीच ग्रामसचिव आणि मंगरुळपीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन सादर केले आहे. येत्या १ मार्च पर्यंत या समस्येवर नियंत्रणासाठी उपाय योजना न केल्यास तहसील कार्यालयावर महिला, बालकांसह घागरमोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर ग्रा.पं. सदस्य जयश्री माचलकर, ग्रा.पं. सदस्य ताईबाई गावंडे, ग्रा.पं. सदस्य धर्मराज बिडकर, माजी सरपंच गणेश जटाळे, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग कोल्हे, गणेश वैद्य, आकाश लांभाडे, राजू खोरणे, मंगेश ठाकरे, सोमकांत लांभाडे, दादाराव ठाकरे, नितेश बोंदे्र, अशोक गायकवाड, विठ्ठल लाभांडे, ज्ञानदेव सुर्वे, बाबाराव खोरणे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी