शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 16:02 IST

नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

केनवड/काजळेश्वर : रिसोड तालुक्यातील केनवड आणि कारंजा तालुक्यातील काजळे्श्वर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.केनवड : मेहकर ते मालेगाव मार्गावर वसलेल्या केनवड येथे ग्रामपंचायतच्या नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. योग्य नियोजन नसल्यामुळे कधी १० व्या दिवशी तर कधी १७ व्या दिवशी नळ येतात. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना एक ते दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तीन, चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल, एवढा जलसाठा विहिरीमध्ये आहे. परंतू, नियोजन नसल्यामुळे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गावकºयांना शेतातील विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे. लहान मुलांसह महिला व आबालवृद्धांनादेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.काजळेश्वर उपाध्ये : येथील विहीरीत पाणीसाठा असूनही गावकºयांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. वीज भारनियमनामुळे जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. याचा फटका गावकºयांना बसत आहे. महावितरणने विद्युत खांबावर तारजोडणी केली नाही. त्यामुळे पाण्यासाठी गावकºयांना वैताग झाला आहे. कुपनलिकेचा आधार घेत गावकरी, महिला पुरुष मे महिन्याच्या उकाडयात सकाळ, दुपार, रात्री या वेळेत गर्दी नसेल तेव्हा पाणी भरत असल्याचे दिसून येते. तर गुरांकरीता पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था महेंद्रा पाटील उपाध्ये आणि दिलीप पा. उपाध्ये या बंधूंनी त्यांच्या हौदावर केली आहे. मे महिन्यात पाण्यासाठी गावकºयांची गैरसोय होत असल्याने याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव टेलर जाधव यांनी १७ मे रोजी केली.

 काजळेश्वरला पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर स्वतंत्र रोहित्र मंजूर आहे. मात्र विद्युत खांबावर लॉकडाउनमुळे तार जोडणी बाकी आहे. येत्या तीन दिवसात महावितरणाकडून तार मिळेल व तारजोडणी झाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा केला जाईल. नितीन पा. उपाध्येसदस्य ग्रामपंचायत काजळेश्वर.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई