शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:46 IST

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे.

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १०८ तर अमरावती ३ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एका टँकरचा अपवाद वगळता उर्वरीत वाशिम व अकोला जिल्हयातील टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी अमरावती विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विभागातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची तिव्रता असून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे सर्वाधिक प्रस्ताव आहेत. आतापर्यंत जवळपास १०८ टँकरला मंजूरी मिळालेली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम व अकोला जिल्ह्यातही पाणीटंचाई असून, टँकरने पाणीपुरवठा करावा, यासंदर्भात प्रशासनदरबारी प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. ३१ मार्चपर्यंत अमरावती जिल्ह्यात ३ आणि यवतमाळ जिल्ह्यात १ टँकर सुरू आहे. दुसरीकडे वाशिम व अकोला जिल्ह्यातील टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी नसल्याने अद्याप टँकर सुरू होऊ शकले नाही. वाशिम जिल्ह्यातील जवळपास १४ गावांचे टँकरसंदर्भात प्रस्ताव आहेत. मात्र, अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई