वाशिम : जिल्ह्यातील शेतकर्यांना यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी आरक्षित पाणीसाठी वगळून शिल्लक राहणारे पाणी सिंचनासाठीन सोडण्याच आदेश संबधित यंत्रणेला दिले आहेत. बिगर सिंचन संस्थांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करण्यासाठी पाणी आरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आदेश देऊन दुष्काळाने होर पळणार्या शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. स. शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता एन. एम. राठोड, रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी डी. एन. इंगोले, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, मंगरूळपीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वि. ब. दातार यांच्यासह पाणी पुरवठा व पाठबंधारे विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील धरणे व बंधार्यामध्ये उपलब्ध असलेल्या उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली.तसेच उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी आवश्यक पाणीसाठा याचीही माहिती यावेळी जिल्ह्याधिका-यांनी घेतली. बिगर सिंचन पाणी वापर संस्थांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार यावेळी जिल्ह्यातील उपलब्ध पाणी आरक्षित करण्यात आले. आरक्षित केलेल्या पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. याबाबत लाभधारकांनी संबंधित सिंचन शाखा कार्यालयांशी संपर्क साधून सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्याची माहिती घ्यावी. तसेच आपल्याकडील थकबाकी भरून पाणी मागणी अर्ज करावा, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतक-यांना सिंचनासाठी मिळणार पाणी
By admin | Updated: November 12, 2014 23:22 IST