शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड शहरातील पाणीपुरवठा योजनेचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 16:55 IST

रिसोड (वाशिम) : रिसोड शहराला नवव्या दिवसानंतर बुधवार, २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला. गत दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड शहराला नवव्या दिवसानंतर बुधवार, २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला. गत दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते.रिसोड शहराला अडोळ प्रकल्पातुन पाणीपुरवठा होतो. दरवर्षी इतरत्र पाण्याची टंचाई असतानाही या प्रकल्पात जलसाठा राहत असल्याने रिसोड शहरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी मिळते. पावसाळा, हिवाळा या ऋतुमध्ये तीन दिवसानंतर पाणी मिळते. उन्हाळ्यात उपलब्ध पाणी लक्षात घेऊन पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजनेचे नियोजन पुरते कोलमडले असून नऊ दिवसांपासून शहरवासीयांना पाणीपुरवठा झाला नव्हता. २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विषयी अनेक समस्या निर्माण होत आहेत. कधी विद्युत रोहित्र जळते तर कधी पाईपलाईन फुटून पाणीगळती होते. २० दिवसांपूर्वी शहरात काही ठिकाणी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यव झाला होता. योग्य नियोजन नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याचा फटका शहरवासियांना बसत आहे. यासंदर्भात नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मिरा संतोष चºहाटे म्हणाल्या की, पाणीपुरवठा योजना प्रभावित होउ नये यासंदर्भात संबंधित अभियंत्यांना सूचना दिलेल्या आहेत. विद्युत रोहित्रदेखील अधून-मधून नादुरूस्त राहते. विद्युत रोहित्राची दुरूस्ती झाल्याने २४ जुलै रोजी पाणीपुरवठा पूर्ववत झाला. यापुढेही नियमित पाणीपुरवठा होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड