शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

वाशिम जिल्हय़ाचा पाणीटंचाई कृती आराखडा जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:24 IST

दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यावर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देपाणीटंचाईची झळ ५१0 गावात ५७८ उपाययोजनांवर ४.४८ कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच वाशिम जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यावर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करून उपाययोजना आखल्या जातात. दरम्यान, २0१७ मधील कृती आराखडा चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला होता. २५२ गावांमध्ये करावयाच्या २५२ उपाययोजनांसाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजनांची आखणी केली असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. 

जिल्हय़ात मंगरूळपीर तालुका ‘डेंजर झोन’मध्येजिल्हय़ातील इतर तालुक्यांच्या तुलनेत यंदा मंगरूळपीर तालुका पाणीटंचाईच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या तालुक्यातील १५ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस केवह १0.५0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्याचा क्रमांक लागत असून, या तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात केवळ ३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, २१ लघुप्रकल्पांमध्ये १२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखड्यातही या तालुक्यांना झुकते माप देण्यात आले.

४९१ विहिरींचे होणार अधिग्रहण!पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हय़ातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून, त्याद्वारे पाणी पुरविण्यात येईल.

वाशिम शहरात होतोय दहा दिवसाआड पाणीपुरवठाएकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक आहे. ते आगामी किमान सहा महिने पुरवावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणी कपातीचे धोरण अंगीकारण्यात आले असून, शहराला सध्या आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.

७४ गावांमध्ये टँकरने होणार पाणीपुरवठाजिल्हय़ातील पाणीटंचाईग्रस्त ५१0 गावांपैकी ७४ गावांना टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. - 

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक