शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Water cup competition :  संयुक्त तिसरे बक्षीस वाशिमच्या बोरव्हा बु. गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 18:40 IST

नागराज मंजुळे यांच्या हस्ते बोरव्हा बु. गावाला तिसऱ्या क्रमांकाचे संयुक्त बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाने वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना संयुक्त तिसरे बक्षीस पटकावत वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा बालेवाडी पुणे येथे ११ आॅगस्ट रोजी पार पडला. पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान, मराठी चित्रपट निर्माता नागराज मंजुळे यांच्या हस्ते बोरव्हा बु. गावाला तिसऱ्या क्रमांकाचे संयुक्त बक्षीस देऊन गौरविण्यात आले.वॉटर कप स्पर्धेचे पहिले ५० लाख रुपयांचे बक्षीस सोलापूर तालुक्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने, दुसरे १५ लाखांचे बक्षीस संयुक्त पणे शिंदी खुर्द मान तालुका सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन या गावांना, तर तिसºया क्रमांकाचे १३ लाख ३५ हजारांचे बक्षीस सयुंक्तपणे मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा बु, सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिंदी खुर्द, तसेच बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील देवरायाची वाडी या गावाने पटकावले. महाराष्ट्रातील ७६ तालुक्यातील ४७६० गावांनी यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला होता. यात मंगरूळपीर तालुक्यातील ६१ गावे सहभागी होती. त्यापैकी ३१ गावांनी ५० दिवस स्पर्धेत जलसंधारणाची कामे केले त्यामधून राज्यातील टार्गेट बोरव्हा बु , तालुक्यातील टार्गेट पिंप्री खु, चिंचाळा, जांब या गावाने पूर्ण केले असल्याने तालुक्यात वॉटर कप कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सदर स्पर्धेचा निकाल ऐकून तालुक्यातील बोरव्हा बु , पिंप्री खु , चिंचाळा, जांब गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या साठी वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने, मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, मंगरूळपीर तालुका समन्वयक समाधान वानखडे, अतुल तायडे, तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे सह जिल्ह्यातील पत्रकार मंडळी, जलदुत, जलमित्र यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य दिल्या बद्दल गावाने कृत्यज्ञता व्यक्त केली.(प्रतिनिधी)

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwashimवाशिम