लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात भारतीय जैन संघटना (बीजेएस) च्या माध्यमातून जलसंधारण व मृदा संधारणाची कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे नियोजन करण्यात येत असून, या संदर्भात २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांनी बैठकीचे आयोजन केले आहे.जिल्ह्यात यापूर्वी बीजेएस आणि राज्य शासनाच्या समन्वयातून यापूर्वी सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्याचा मोठा फायदाही दिसून येत आहे. आता बीजेएसच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणासह मृदा संधारणाची कामे करण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत उपवनसंरक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा जल व मृदा संधारण अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कारंजा पाटबंधारे विभागाचे र्कायकारी अभियंता, वाशिम लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अीियंता उपस्थित राहणार आहेत.
'बीजेएस'च्या माध्यमातून होणार जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:35 IST