शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांत अवकाळी पावसाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:32 IST

वाशिम: जिल्ह्यात १९ नोव्हेंबरच्या रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सुुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांत खोडा निर्माण केला आहे.

खोदकामांत साचले पाणी: प्रशासनासह ग्रामपंचायत पदाधिकाºयांचा हिरमोड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात १९ नोव्हेंबरच्या रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सुुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांत खोडा निर्माण केला आहे. अर्धवट खोल समतल चर, नाला खोलीकरण आणि शेततळ्यांत पाणी साचल्याने या ठिकाणी मशीनने खोदकाम करण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे किमान एक दोन दिवस कामे बंद ठेवावी लागणार आहेत. यामुळे या कामासाठी पुढाकार घेणारी भारतीय जैन संघटना, तसेच प्रशासनासह ग्रामपंचायत पदाधिकाºयांचा थोडा हिरमोड झाला आहे. राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, शेततळे, वनतळे, खोल समतल चरसह नदी खोलीकरणही करण्यात येत आहे. कृषी विभागासह पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत असून, कामांसाठी ग्रामपंचायतींचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात मानोरा, मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगाव तालुक्यात ही कामे वेगाने करण्यात येत आहेत. त्यामुळेच प्रस्तावित केलेल्या कामांपैकी अनेक कामे पूर्णत्वास आली असताना सोमवार १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या कामांत खोळंबा निर्माण झाला आहे. जमा झालेले पाणी जमिनीत मुरणे किंवा बाष्पीभवनामुळे नष्ट होईपर्यंत ही कामे थांबवावी लागणार असल्याने प्रशासन आणि ग्रामपंचायतींसह बीजेएसचे पदाधिकारी आणि जलनायकांचा हिरमोड झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी