शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विभागीयस्तरावर जलदूत, जलप्रेमींना जलसंधारणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:44 IST

जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

वाशिम: पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास परिषद प्रबोधनीच्यावतीने राज्यातील भूजल पातळीची स्थिती आणि जलसंधारणाबाबत जलदूत, जलप्रेमींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत अमरावती येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शासनाच्या जलचळवळीत कार्यरत जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.अमरावती येथे आयोजित कार्यशाळेत २५ फेब्रुवारी रोजी जलदूत दिलिप काळे यांनी पाण्याचे महत्त्व व जलसाक्षरता कशासाठी या विषयावर सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलसंधारण करण्याची कारणे आणि उपाय यावर गजानन काळे यांनी मार्गदर्शन केले, सायंकाळच्या सत्रा संजय कराड यांनी भुरचना शास्त्रबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठ परिसर अभ्यास दौरा करून श्रमदान करण्यात आले,तसेच दुपारच्या सत्रात अरविंद कडबे यांनी जलप्रदुषण, सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धतीबाबत मार्गदर्शन केले, तर सायंकाळी किरण हातगावकर यांनी पाणी वाटप संस्थांची कार्ये आणि आवश्यक तेवर प्रकाश टाकला. २७ फेबु्रवारी रोजी राज्याचे जलनायक तथा पर्यावरण तज्ज्ञ डॉ निलेश हेडा यांनी सकाळच्या सत्रात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नदी खोरे समजून घेणे किती आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलदूत रविंद्र इंगोले यांनी पाण्याच्या ताळेबंदाबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात कार्यशाळेचे मुल्यमापन व चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत विभागातील ६० पेक्षा अधिक जलदूत आणि जलप्रेमीनी सहभाग घेतला होता.

जलसंधारणासाठी राज्य शासनाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यभरात जलप्रेमींना जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. यासाठी राज्यस्तरापासून गावस्तरापर्यंत मार्गदर्शक म्हणून जलनायक, जलदुतांची निवड करण्यात आली आहे.-डॉ. निलेश हेडाराज्य जलनायक, तथा पर्यावरण तज्ज्ञ 

टॅग्स :washimवाशिम