शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जलसंधारण विभागाला हवे अतिरिक्त ३१५ कोटी; मंजूर केवळ ३५ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:21 IST

Water Conservation Department : देखभाल दुरूस्तीची कामे कशी करावी? असा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : साठवण तलावांचे पाझर तलावात रुपांतर, सिंचनासाठी पाईप व्यवस्था, लघु प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती, साठवण बंधाऱ्यांची निर्मिती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने २०२०- २१ मध्ये जिल्हा नियोजन विभागाकडे अतिरिक्त ३१५ कोटींच्या निधीची मागणी नोंदविली होती. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याने देखभाल दुरूस्तीची कामे कशी करावी? असा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.ग्रामीण भागात सिंचनाची सुविधा निर्माण करणे, जलपातळीत वाढ करणे आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे लघु प्रकल्प, पाझर तलाव, साठवण तलाव, कालवे दुरूस्तीची कामे केली जातात. लघु प्रकल्प, साठवण व पाझर तलाव, कालवे आदींची आयुर्मर्यादा साधारणत: ४० ते ४५ वर्षे असते. बहुतांश प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपत येत असल्याने देखभाल दुरूस्ती होणे गरजेचे ठरत आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने देखभाल दुरूस्ती कशी करावी? हा पेच आहे. नवीन साठवण तलाव, जुन्या साठवण तलावाचे पाझर तलावात रुपांतर, प्रवाही सिंचन योजनेंतर्गतचे अनेक कालवे नादुरूस्त असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पाईपलाईन टाकणे, आयुर्मर्यादा संपत आलेल्या प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती आदींसाठी जलसंधारण विभागाला जवळपास ३१५ कोटींच्या अतिरिक्त निधीची गरज आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून हा निधी मिळावा, याकरिता जलसंधारण विभागाने गतवर्षी जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. निधी मात्र अद्याप मिळाला नाही. निधीअभावी प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीची कामे प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :washimवाशिम