शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

वाशिम जिल्हा परिषदेला २१ वर्षात लाभले २२ कृषी विकास अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:50 IST

वाशिम : १ जुलै १९९८ पासून ते १ मार्च २०१९ या २१ वर्षात वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल २३ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. यापैकी तब्बल १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ जुलै १९९८ पासून ते १ मार्च २०१९ या २१ वर्षात वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल २३ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. यापैकी तब्बल १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषीविषयक योजना पात्र शेतकºयांपर्यंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, खतांचे नियोजन, आपतकालिन परिस्थितीत शेतकºयांना मार्गदर्शन यासह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे.  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे प्रमुख म्हणून कृषी विकास अधिकारी यांची नेमणुक शासनातर्फे केली जाते. अकोला जिल्ह्यातून स्वतंत्र जिल्हा म्हणून वाशिमची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली. तेव्हापासून वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा वाशिममध्ये स्वतंत्रपणे कारभार सुरू आहे. प्रथम कृषी विकास अधिकारी म्हणून डी.के. पांडे यांनी सेवा दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेला नियमित व पूर्णवेळ कृषी विकास अधिकारी कमी लाभले. २१ वर्षात तब्बल २२ कृषी विकास अधिकारी वाशिमला लाभले आहेत. यामध्ये डि.के.पांडे, एम.ए.शेख (तीन वेळा), प्रकाश लोखंडे (पाच वेळा), अ.म.इंगळे,  एस.एम. सोळुंके,  डी.डी. इंगळे, एन.व्ही.देशमुख (दोन वेळा), पी.के.खंडारे, अनिल बोंडे, पी.एस.शेळके, चंद्रकांत सुर्यवंशी, अभिजित देवगिरकर, नरेंद्र बारापत्रे, अवचार, पी.एस. शेळके यांचा समावेश आहे. २०१५ मध्ये चंद्रकांत सुर्यवंशी यांची बदली झाल्यानंतर कृषी विकास अधिकारी म्हणून पी.जी.कुळकर्णी रूजू होणार होते. मात्र, ते रूजू झाले नसल्याने अभिजित देवगिरकर यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर देवगिरकर यांची वाशिम तालुका कृषी अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर मोहिम अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांच्याकडे प्रभार सोपविला. बारापत्रे यांच्यानंतर अवचार आणि आता पी.एस. शेळके यांच्याकडे कृषी विकास अधिकारी पदाचा प्रभार सोपविलेला आहे. १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली तर सहा कृषी विकास अधिकारी नियमित लाभले. यामध्ये डी.के.पांडे, अ.म. इंगळे, एस.एम. सोळुंके, एन.व्ही. देशमुख दोन वेळा आणि चंद्रकांत सुर्यवंशी असे सहा नियमित अधिकाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद