शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : महावितरणचे सहाय्यक अभियंता व खासगी लाईनमन ‘एसीबीच्या’ जाळ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:37 IST

वाशिम :  विद्युत मीटर फॉल्टी असून पुढील कार्यवाही टाळण्यासाठी सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनी १५ दिवसांपुर्वी एका ग्राहकास ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीच्या पडताळणीदरम्यान खासगी लाईनमन राजेश इढोळे याने ३० डिसेंबरला १७ हजार ५०० रूपये व १ जानेवारीला १२ हजार ५०० रूपये स्विकारताना एसीबी पथकाने त्यास रंगेहात पकडले.

ठळक मुद्देग्राहकास ३० हजाराची मागितली लाच : वाशिम येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  विद्युत मीटर फॉल्टी असून पुढील कार्यवाही टाळण्यासाठी सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनी १५ दिवसांपुर्वी एका ग्राहकास ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीच्या पडताळणीदरम्यान खासगी लाईनमन राजेश इढोळे याने ३० डिसेंबरला १७ हजार ५०० रूपये व १ जानेवारीला १२ हजार ५०० रूपये स्विकारताना एसीबी पथकाने त्यास रंगेहात पकडले. दरम्यान, दोषी आढळलेले सहायक अभियंता व्यवहारे आणि खासगी लाईनमन इढोळे अशा दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिम ते सोनखास मार्गावर असलेल्या माधव नगर येथे तक्रारदाराचे घर आहे. त्यांच्या घरी दोन विद्युत मीटर लावलेले आहेत. दरम्यान, १५ दिवसांपुर्वी सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनी मीटरची तपासणी करून तुमचे मीटर फॉल्टी आहे. तुमच्यावर कार्यवाही होईल, अशी बतावणी करून कार्यवाही टाळण्याकरिता ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी सकाळी खासगी लाईनमन राजेश इढोळे हा तक्रारदाराच्या घरी गेला व व्यवहारे यांच्याशी झालेल्या बोलणीनुसार तुमचे मीटर जुने आहे बदलून देतो; परंतु ३० हजार रूपये द्यावे लागतील, अशी तक्रार संबंधित ग्राहकाने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे दाखल केली. त्यावरून एसीबीच्या पथकाने ३० डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यात इढोेळेने तक्रारदाराकडून १७ हजार ५०० रूपये स्विकारल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित १२ हजार ५०० रुपयांची रक्कम १ जानेवारी रोजी स्विकारताना लाईनमन इढोळे यास एसीबीने रंगेहात पकडले. तद्नंतर एसीबीच्या पथकाने लगेचच सहाय्यक अभियंता रविंद्र व्यवहारे यांनाही ताब्यात घेतले. संबंधित दोघांविरूध्दही लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७, १२, १३ (१)(ड), सहकलम १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक सुनिता नाशिककर, अप्पर पोलीस अधिक्षक आर. व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक एन.बी. बोºहाडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हा